|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खासदार प्रभाकर कोरे यांना येडूर विश्वचेतन पुरस्कार जाहीर

खासदार प्रभाकर कोरे यांना येडूर विश्वचेतन पुरस्कार जाहीर 

वार्ताहर/ येडूर

येथील वीरभद्रेश्वर देवस्थान व काडसिद्धेश्वर संस्थान मठातर्फे विश्वचेतन पुरस्कार राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती देवस्थान व काडसिद्धेश्वर मठातर्फे देण्यात आली आहे.

डॉ. कोरे यांनी केएलई संस्थेच्या माध्यमातून देशविदेशात शिक्षण व वैद्यकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजींनी प्रतिष्ठेचा विश्वचेतन पुरस्कार जाहीर केला आहे. श्री वीरभद्रेश्वर देवाची विशाळी यात्रा व महारथोत्सव 26 जानेवारी ते 28 जानेवारीअखेर होणार आहे. 27 जानेवारी रोजी सायंकाळी होणाऱया विशेष कार्यक्रमात खासदार डॉ. कोरेंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, प्रशस्ती पत्र असे आहे.