|Thursday, November 15, 2018
You are here: Home » मनोरंजन » पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट – ती सध्या काय करते

पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट – ती सध्या काय करते 

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाला खास महत्त्व असते. असं म्हणतात की आपलं पहिलं प्रेम कोणी विसरूच शकत नाही, ते कायमचं आपल्या सोबत असतं, मनातल्या कोपऱयात लपलेलं! त्या खास व्यक्तिबद्दल नेहमीच काहीतरी जाणून घेण्याची एक उत्सुकता मनात असते आणि एक प्रश्न मनात येतो की ती किंवा तो सध्या काय करत असेल? या उत्सुकतेला घेऊनच झी स्टुडिओजचा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्याचे नाव आहे  ती सध्या काय करते.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना एक खास भेट देण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून झी स्टुडिओजने पाडला आहे. नटरंग, टाईमपास, लोकमान्य, नटसम्राट अशा दर्जेदार कलाकृती देणाऱया झी स्टुडिओज् निर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट येत्या नववर्षाच्या पहिल्याच आठवडय़ात म्हणजेच 6 जानेवारी 2017 ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सफष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी आणि ‘होणार सून मी या घरची’मधून घराघरांत पोचलेली तेजश्री प्रधान ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे तसेच झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्पमध्ये आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी आर्या आंबेकर या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसफष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत हे विशेष.

 दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले की, प्रत्येक जण किमान एकदा तरी प्रेमात पडतोच, आणि एकमेकांच्या प्रेमात पाडण्यासाठी दोघांची गरज असते असं माझं ठाम मत आहे. कधीतरी मित्रांसोबत बसलेलो असताना हा प्रश्न खरंच डोकावतो की ती सध्या काय करत असेल? आणि याच भावनेला घेऊन हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे ती सध्या काय करते हा अनुराग इतकाच तन्वीचा चित्रपट आहे. अनुरागच्या भूमिकेत अंकुश आणि अभिनय, तन्वीच्या भूमिकेत तेजश्री आणि आर्या असणे हे खरंच माझ्यासाठी आणि चित्रपटासाठी खूप महत्वाचे आहे. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाची कथा आहे प्रत्येकाच्या पहिल्या प्रेमाची. ही कथा आहे अनुराग आणि तन्वीची. त्यांच्या शाळेच्या अल्लड दिवसांपासून ते आजपर्यंतची. प्रेमाला वयाचं बंधन नसतं. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कोणीतरी एक खास माणूस असतं. आपल्या मनात एक हक्काची जागा असलेलं. अनुराग आणि तन्वी याला अपवाद नाहीत. या चित्रपटात अनुराग आणि तन्वीच्या प्रेमकथेचे तीन टप्पे अनुभवायला मिळणार असून अनुरागची भूमिका साकारली आहे हृदित्य राजवाडे, अभिनय बेर्डे आणि अंकुश चौधरीने तर तन्वीच्या भूमिकेत निर्मोही अग्निहोत्री, गायिका-अभिनेत्री आर्या आंबेकर आणि तेजश्री प्रधान आहे. याशिवाय चित्रपटात सुकन्या कुलकर्णीöमोने, संजय मोने, अनुराधा राजाध्यक्ष, प्रसाद बर्वे आणि तुषार दळवी हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत आहेत.

झी स्टुडिओज्चे निखिल साने आणि असंख्य प्रोडक्शनच्या पल्लवी राजवाडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचे असून, पटकथा आणि संवाद मनस्विनी लता रवींद्र यांचे आहेत. या चित्रपटात एकूण चार गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत निलेश मोहरीर, अविनाश-विश्वजित आणि मंदार आपटे यांनी. यात जरा जरा आणि परिकथेच्या पऱया ही गाणी अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केली असून ती आर्या आंबेकर आणि हृषीकेश रानडे यांनी गायली आहेत. हृदयात वाजे समथिंग हे गाणं लिहिलंय विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी तर हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर यांनी स्वरबद्ध केलं आहे.

Related posts: