|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एनएसजीची वेबसाइट हॅक, मोदींविरोधात अपमानास्पद संदेश

एनएसजीची वेबसाइट हॅक, मोदींविरोधात अपमानास्पद संदेश 

नवी दिल्ली

नॅशनल सिक्युरिटी गार्डची (एनएसजी) वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. हॅकर्सने वेबसाईट हॅक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद संदेश लिहिले. वेबसाईटच्या होमपेजवर पोलिसांकडून नागरिकांना मारहाण होतानाचे एक जुने छायाचित्र देखील पोस्ट केले गेले. ज्यात काश्मीरला स्वतंत्र करण्याचा संदेश लिहिण्यात आला आहे.

एनएसजीची वेबसाईट रविवारी एका समूहाने हॅक केली. या समूहाने स्वतःला ‘अलोन इंजेक्टर’ म्हटले आहे. या हॅकिंगमागे एखादा पाकिस्तानी गट असावा असा संशय व्यक्त केला जात आहे, कारण हॅकर्सने पाकची हेरयंत्रणा आयएसआयचा उल्लेख केला आहे आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देखील दिल्या आहेत.

डिसेंबर महिन्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या ट्विटर अकौंटला लक्ष्य बनविण्यात आले होते. यानंतर काही पत्रकारांचे अकौंट देखील हॅक करण्यात आले होते. तसेच त्रिवेंद्रम येथील विमानतळाची वेबसाईट हॅक केली गेली होती

Related posts: