|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 17 मुलांनंतर दांपत्याचे कुटुंब नियोजन

17 मुलांनंतर दांपत्याचे कुटुंब नियोजन 

गुजरातमधील घटना : गावकऱयांनी समजूत घातल्यानंतर आले शहाणपण

होंदाहोद / वृत्तसंस्था

गुजरातमध्ये मुलांची इच्छा बाळगणाऱया दांपत्याने 16 मुली आणि 1 मुलगा जन्माला घातला. आता गावकऱयांनी समजविल्यानंतर पती-पत्नी नसबंदीसाठी राजी झाले. आदिवासी समुदायातील असणाऱया राम सिंग याने काही दिवसांपूर्वीच पत्नीची नसबंदीची शस्त्रक्रिया करविली.

झरिबुडी गावाचा रहिवासी असणारा राम सिंग 14 मुलींची जबाबदारी सांभाळण्यासाठी दोन मुले इच्छित होता. तो 2 एकर शेतीत मका आणि गव्हाचे पीक घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. तर अतिरिक्त उत्पन्नासाठी पत्नीला मजुरी करावी लागते. सरकारच्या घोषणेला (हम दो, हमारे दो) दूर सारत राम सिंग याने ‘हम दो, हमारे 17’ अशी स्थिती निर्माण केली. जवळपास 2 वर्षांपूर्वी या दांपत्याला कन्याप्राप्ती झाली होती.

गावकऱयांनी राम सिंग आणि कानू या दांपत्याला कुटुंबनियोजनाचे महत्त्व समाजवून सांगितले. महागाईच्या काळात एवढय़ा मुलांचे पालनपोषण करणे अवघड असल्याचा तर्क त्यांना देण्यात आल्याचे सरपंच वियरल बेन यांनी म्हटले.

मुलांच्या जन्मतारखाच माहिती नाहीत

आपल्याला 17 मुलांच्या जन्मतारखाच माहिती नाही, अनेकांचे तर आतापर्यंत नामकरण करण्यात आलेले नाही. मुलगा विजयचा जन्म 2013 साली झाला होता, 16 पैकी 2 मुलींचा मृत्यू झाला, तर दोघींचा विवाह झाला आहे. दोन मुली राजकोटमध्ये काम करत असल्याचे राम सिंग यांनी सांगितले. दोन मुले असावीत अशी पतीची इच्छा होती. आमच्या समाजात बहिणींची जबाबदारी भावालाच पार पाडावी लागते. माझा एकमात्र मुलगा हा भार उचलण्यास सक्षम नसल्याचा दावा पत्नी कानूने केला.