|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सफारी स्टॉर्म, जेनॉनचा वापर करणार सुरक्षादल

सफारी स्टॉर्म, जेनॉनचा वापर करणार सुरक्षादल 

टाटा मोटर्सचे वाहन : कंपनीकडून अधिकृत पुष्टी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय सुरक्षादल आगामी काळात टाटा मोटर्सची ‘सफारी स्टॉर्म’, ‘जेनॉन’चा वापर करताना दिसून येतील. टाटा मोटर्सने अधिकृतपणे याची पुष्टी केली आहे. टाटा मोटर्सने याप्रकरणी महिंद्रा अँड महिंद्रा तसेच मारुती सुझुकी या कंपन्यांना मागे टाकत हे कंत्राट मिळविले आहे.

बीएसएफ जवळपास 500 टाटा ‘जेनॉन’ सीमेवरील गस्तीसाठी विकत घेणार आहे. जेनॉनद्वारे वर्तमान जिप्सी गाडय़ा बदलल्या जातील. याचप्रकारे भारतीय लष्कर सध्या 3192 टाटा ‘सफारी स्टॉर्म’ घेणार आहे. जवळपास 35 हजार वाहने नजीकच्या भविष्यात आणखी विकत घेतल्या जातील असे टाटा कंपनीचे उपाध्यक्ष (संरक्षण उद्योग) वर्नन नोरोन्हा यांनी सांगितले.

चांगली क्षमता

6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सने सज्ज सफारी स्टॉर्मचे इंजिन 154 बीएचपीचे शक्ती आणि 400 एनएम टॉर्क उपलब्ध करते. यात ऑल-व्हील ड्राइव्ह आणि इलेक्ट्रॉनिक शिफ्ट-ऑन-द-फ्लाय सारखी वैशिष्टय़े अंतर्भूत आहेत. वाहनात एबीएस सिस्टीमसोबत ईबीडीचा लाभ देखील वापरकर्त्याला मिळतो. तसेच हे वाहन 12.8 सेकंदात 0-100 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडण्यास सक्षम आहे.

ऑटोमॅटिक ट्रान्समिशनयुक्त

जेनॉन या मॉडेलसाठी डिझेल इंजिन वापरण्यात आले असून जे 145 बीएचपीच्या शक्तीसह 320 एनएमचा टॉर्क देतो. याचे दमदार इंजिन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने युक्त आहे.

Related posts: