|Saturday, January 19, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियाच्या हंगामी प्रशिक्षक पथकात पाँटींग दाखल

ऑस्ट्रेलियाच्या हंगामी प्रशिक्षक पथकात पाँटींग दाखल 

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघासाठी नियुक्त केलेल्या हंगामी प्रशिक्षक पथकामध्ये माजी कर्णधार रिकी पाँटींग दाखल झाला आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.

या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माजी कसोटीवीर जस्टीन लँगरकडे प्रमुख प्रशिक्षकपद सोपविले असून जेसन गिलेस्पी आणि रिकी पाँटींग यांच्याकडे साहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा नियमित प्रमुख प्रशिक्षक डरेन लिमन आणि साहाय्यक प्रशिक्षक डेव्हिड सॅकेर यांच्यावर भारताविरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या पूर्वतयारीवर लक्ष अधिक केंद्रीत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

माजी कर्णधार रिकी पाँटींग 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत कसोटीत 51.81 धावांच्या सरासरीने 13378 धावा तर वनडे क्रिकेटमध्ये 42.03 धावांच्या सरासरीने 13704 धावा जमविल्या आहेत.

Related posts: