|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » स्पेनचा राफेल नादाल विजेता

स्पेनचा राफेल नादाल विजेता 

वृत्तसंस्था/ अबु धाबी

स्पेनच्या राफेल नादालने 2016 च्या टेनिस हंगामाची सांगता विजेतेपदाने केली. शनिवारी नादालने येथे मुबदेला विश्व टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद चौथ्यांदा पटकाविले.

30 वर्षीय नादालने एकेरीच्या अंतिम सामन्यात बेल्जियमच्या डेव्हिड गोफीनचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव केला. या स्पर्धेत कॅनडाच्या मिलोस रेओनिकचा 6-3, 7-6 (8-6) असा पराभव करत ब्रिटनच्या अँडी मरेने तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेमध्ये निवडक टेनिसपटू सहभागी झाले होते. फ्रान्सच्या त्सोंगाने झेकच्या बर्डीचचा 6-7 (5-7) 6-3, 10-3 असा पराभव करत पाचवे स्थान मिळविले.