|Thursday, August 16, 2018
You are here: Home » क्रिडा » केनियाचा सुमगाँगचा विक्रम

केनियाचा सुमगाँगचा विक्रम 

वृत्तसंस्था/ साओ पावलो

शनिवारी येथे झालेल्या ब्राझीलियन रोडरेसमध्ये केनियाच्या जेमिमा सुमगाँगने नवा विक्रम नोंदविला. केनियाची सुमगाँगने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या रोडरेसमध्ये सुवर्णपदक मिळविले होते.

शनिवारी येथे झालेल्या सेंट सिल्व्हेस्टर रोडरेसमध्ये सुमगाँगने 15 कि.मी.चे अंतर 48 मिनिटे, 35 सेकंदाचा अवधी घेत पार केला. सुमगाँगने 2016 च्या लंडन मॅरेथॉनमध्ये विजेतेपद मिळविले होते.  ब्राझीलियन रोडरेसमध्ये सुमगाँगचा हा नवा विक्रम आहे. 2011 साली या स्पर्धेत  केनियाच्या डॅनियलने नोंदविलेला 48 मिनिटे, 48 सेकंदाचा विक्रम सुमगाँगने मागे टाकला. या स्पर्धेत पुरूष विभागात इथोपियाच्या अलेमिने 44 मिनिटे, 53 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद मिळविले.

Related posts: