|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘ऍश’ शॉर्ट फिल्मला लंडनमध्ये नामांकन

‘ऍश’ शॉर्ट फिल्मला लंडनमध्ये नामांकन 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

लंडनमध्ये होणाऱया वर्ल्ड इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये कोल्हापूरातील ऍश या शॉर्ट फिल्मची निवड झाली आहे. या फेस्टीव्हलमध्ये जगभरातून हजारो फिल्म दाखल झाल्या होत्या त्यापैकी भारतातून या शॉर्ट फिल्मची निवड झाली आहे.

वर्ल्ड फिल्म फेस्टीव्हल हे जगातील नामांकित फेस्टीव्हल आहे. कारण या फेस्टीव्हलमध्ये निवड होणाऱया शार्ट फिल्मचे जगातील 20 शहरात स्क्रिनिंग होते. लॉस एंजिल्स,न्यूयार्क,टोराटो, व्हॅनकोअर, लंडन, अमरस्टॅम,बर्लीन, व्हिएन्ना, जिनिव्हा, माद्रीद, पॅरीस, रोम, रेकजवीक, मॉस्को, हाँगकाँग, सिंगापूर, ब्रिटन, मलेशिया या शहरात ऍश चे स्क्रिनिंग होणार आहे. कोल्हापूरच्या उदय पाटील यांनी बनवलेली ही वर्ल्ड फेस्टीव्हलनिमित्त  सातासमुद्रापार झळकणार आहे.

ऍश या शॉर्ट फिल्मची संकल्पना निर्माता, दिग्दर्शक उदय पाटील आहेत. या फिल्ममधून त्यांनी व्यसनातून होणाऱया दुष्परिणामाची दाहकता मांडली आहे. या फिल्मविषयी बोलताना पाटील म्हणाले, यातून चेनस्मोकरांना वेळीच सावध होण्याची गरज आहे. या फिल्मचे सहनिर्माते व असोसिएट दिग्दर्शक अशोक बापू कांबळे व मोहन भरवसे आहेत. छायांकन विलास चौगुले, संकलन सलोनी कुलकर्णी  पार्श्वसंगीत रवी सुतार यांचे आहे. वैभव जकाते, योगेश भाट, संजय शिंदे यांचेही यासाठी सहकार्य लाभले आहे.

Related posts: