|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विद्यार्थ्यांनो सकारात्मक दृष्टी ठेवाःश्रीधर कुलकर्णी

विद्यार्थ्यांनो सकारात्मक दृष्टी ठेवाःश्रीधर कुलकर्णी 

प्रतिनिधी/ सरवडे

विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर यश निश्चित मिळते. तसेच विद्यार्थी दशेतील ज्ञान हे भविष्यकाळ उज्वल करते. असे प्रतिपादन श्रीधर कुलकर्णी यांनी केले.

येथील शिवाजीराव खोराटे विद्यालय, तंत्रविभाग व ज्युनि. कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था सचिव विठ्ठलराव खोराटे होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.

प्रास्ताविक प्राचार्य एल. डी. चौगले, पाहुण्यांचा परिचय तंत्रविभागप्रमुख जे. बी. जाधव, अहवालवाचन पर्यवेक्षक बी. एन. मगदूम यांनी केले. यावेळी पंडीत पाटील, संस्थाध्यक्ष ए. बी. रानमाळे यांची भाषणे झाली.

कार्यक्रमास उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, संचालक मंडळ, माजी प्राचार्य वाय. एस. चव्हाण, एम. डी. पाटील, व्ही. टी. एरूडकर, प्रा. बाबासो मुळे, जोतीराम पाटील, दीपक पाटील, अशोक खोराटे, डॉ. संताजी पाटील, रमेश पाटील, धोंडीराम एटाळे, संतोष पाटील यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन एस. बी. वागवेकर यांनी केले. आभार उपप्राचार्य आर. डी. पाटील यांनी मानले.

Related posts: