|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आई-बापाच्या कष्टाची जाण असणारी पिढीच आदर्श निर्माण करतातःआनंदा शिंदे

आई-बापाच्या कष्टाची जाण असणारी पिढीच आदर्श निर्माण करतातःआनंदा शिंदे 

प्रतिनिधी/ कसबा तारळे

आई-बापाच्या कष्टाची जाण व स्वतःच्या परिस्थितीचे भान तसेच व्यसनापासून दूर राहणारी असणारी पिढीच स्वःत्वातील स्वः शोधून आदर्श निर्माण करतात.   असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक आनंदा दिनकर शिंदे-राशिवडेकर यांनी केले.

तारळे येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व मौनी विद्यापीठ संचलित आयसीआरई गारगोटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत फिरता तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्यात ते प्रमुक्त वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य के. जी. लाड होते.

शिंदे पुढे म्हणाले, मन, मेंदू आणि मनगट बलवान असेल तरच बलशाली भारत होण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी दिशाहिन न होता दिशादर्शक व्हावे. शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रगत तंत्रज्ञान येत आहे. हे तंत्रज्ञान अवघत करून बलशाली भारत घडवूया.

स्वागत आयटी विभागाचे लॅब असिस्टंट उदय पाटील यांनी केले. प्रा. किरण हुपरीकर यांनी प्रास्ताविकांत कार्यक्रमाचा हेतू व आयसीआरईचे विविध कोर्सची माहिती दिली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी वर्षभर प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीना वर्कशॉप प्रमुख राहूल सुर्यवंशी, पंकज पाटील, जयसिंग पोवार, ए. एम. पाटील, प्रा. एस. बी. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक बी. जी. पाटील, श्रीकांत वणकुंद्रे, अमोल नगारे, एन. के. पाटील, एम. एस. चौगले, सुनिल कांबळे, एम. टी. पाटील, ए. टी. पाटील आदीसह 17 विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. आभार रमेश साबळे यांनी मानले.

 

Related posts: