|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पलूस नगरपरिषदेचा शहर हागणदारी मुक्तीचा संकल्प

पलूस नगरपरिषदेचा शहर हागणदारी मुक्तीचा संकल्प 

प्रतिनिधी/ पलूस

नवीन वर्षाच्या सुरूवातीला पलूस नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांनी पलूस शहर संपूर्ण हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासनाकडून शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रूपये थेट अनुदान मिळणार आहे. याचा लाभ नागरीकांनी घ्यावा असे आवाहन  नगराध्यक्ष राजाराम सदामते यांनी केले आहे.

नगराध्यक्ष सदामते पुढे म्हणाले, नगरपरिषदेवर कॉग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच सर्व नगरसेविकांची प्रभारी मुख्याधिकारी महेश रोकडे व माहिती व तंत्रज्ञान तज्ञ सुहास चव्हाण यांच्या उपस्थित बैठक झाली. या बैठकीत सर्व नगरसेवकांनी पलूस शहर हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. येत्या 26 जानेवरी पर्यत पलूस शहरातील घर तिथे शौचालये करून दाखवण्याठी आमचा प्रयत्न राहणार आहे. पहिल्याच दिवशी  शौचालये बांधकामाचे दहा प्रस्ताव दाखल झाले आहेत.

  इस्लामपूर, तासगाव, विटा, आष्टा या नगरपालिके पाठोपाठ पलूस नगरपरिषद हागणदारी मुक्त करण्यासाठी पलूस नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवक जोमाने कामाला लागावे. ज्या नगरसेवकांचा प्रभाग शंभर टक्के हागणदारी मुक्त होईल. त्या नगरसेवक खास बक्षिस देण्यात येईल. ज्या कुटुब्ंाास शौचालय नाही अशा कुटुंबाने तत्वरीत नगरपालिकेशी संपर्क साधून शौचालय बांधावे, शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून बारा हजार रूपये अनुदान प्राप्त होणार आहे. लाभार्थीनी  कागदपत्रे नगरपरिषदेमध्ये जमा केल्यास लाभधारकांच्या खात्यावर थेट सहा हजार रूपये जमा होतील. त्यानंतर उर्वरीत शौचालय पूर्ण झाल्यानंतर सहा हजार रूपये जमा होणार आहेत. त्यानंतरची रक्कम नगरपालिका चौदाव्या वित्त आयोगातून देईल.

पलूसमधील गोंदीलवाडी, पदमानंदनगर, कृषीनगर, धोंडीराज नगर, मातंगवस्ती, जोशी वस्ती यासह अन्य परिसरात शौचालय नसल्याचे आढळून आले आहे. तरी देखील शहरातील सर्व भागाचा नव्याने सर्व्हे करून ज्या कुटुंबाना शौचालय नाही अशांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. पलूस शहर हाणगदारी मुक्त झाले तर शहराच्या विकासासाठी एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यातून शहराचा विकास साधता येईल. शहराच्या विकासासाठी नागरीकांनी  पुढे यावे असे आवाहनही नगराध्यक्ष सदामते यांनी केले आहे. या बैठकीस गटनेते सुहासराव पुदाले, नगरसेवक नितीन जाधव, विशाल दळवी, रेखा भोरे, ऋषीकेश जाधव, गिरीष गोंदील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.