|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पाणीपुरवठा करणा-या बंधा-यातून होतीय पाणीचोरी

पाणीपुरवठा करणा-या बंधा-यातून होतीय पाणीचोरी 

पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणा-या येथील दगडीपुलाशेजारील बंधा-यातून सध्या खुलेआम पाणीचोरी होत आहे. त्यामुळे उजनी धरण पूर्णक्षमतेने भरले असताना देखिल नुकत्याच झालेल्या पाणीटंचाईसारखी अवस्था येत्या काळात लवकरच येउ शकते.

  गेल्या 20 दिवसापूर्वी पंढरपूर हे शहरावर उजनी धरणात 100 टक्के पाणीसाठा असताना देखिल टंचाईचे संकट आले होते. त्यावेळी पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणा-या दगडी पुलाजवळील बंधा-यामधे फ्ढक्त 15 दिवस पुरेल इतकेच पाणी होते. त्यामुळे शहरास एक ते दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. त्यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी शहरांच्या पाणीपुरवठयासाठी जलसंपदा मंत्र्याकडे धाव घेउन नदीमधे पाणी सोडण्याचीं मागणी केली होती. त्यानुसार 21 डिंसेबरला पाणी सोडण्यांचे ठरले होते. मात्र सदरचे पाणी हे साधारणपणे 24 डिसेंबरला पाणी सोडण्यात आले. त्यानंतर साधारणपे 26 डिंसेबरच्या दरम्यान उजनीचे पाणी पंढरपूरात आले. आणि पंढरपूर शहराचा काही काळ अनियमित झालेला पाणीपुरवठा हा परत पूर्ववत करण्यात आला होता.

 

   त्यावेळी येथील बंधारा हा सुमारे तीन मीटरपर्यत भरून घेण्यात आला होता. आणि उरलेले पाणी हे चंद्रभागेच्या पात्रामधे सोडून देण्यात आले होते. सदरचे पाणी हे पंढरपूर शहराला साधारणपणे 3 महीने पुरेल असा प्रशासनास आहे. आणि त्यानंतर रब्बी हंगामाच्या दुस-या आवर्तनावेळी पंढरपूर शहराला परत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याचे पाणी हे तीन महीने पुरवावे लागणार आहे.

 

  मात्र असे असताना देखिल येथील पाणीपुरवठा करणा-या बंधा-याच्या नजीकरच मोठया प्रमाणावर नदीकाठच्या शेतक-यांनी आपल्या मोटारीच्या पाईप हया नदीमधे सोडून मोटारीच्या सहाय्याने पाणी आपल्या शेताला चोरून घेत आहेत. आणि याकडे येथील प्रशासनाचे संपूर्णपणे दुर्लक्ष असलेले दिसून येत आहे. आणि असे जर झाले तर येत्या काळातही सोलापूर जिल्हयासाठी वरदायिनी असणारे उजनी धरणात पाणी असताना देखिल पंढरपूरला पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.

 

  सध्या येथील बंधा-यावर मोठया प्रमाणावर अवैधरित्य पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीचोरी होत आहे. आणि याकडे पालिका प्रशासन तसेच भीमा पाटबंधारे विभाग आदिंचेही मोठयाप्रमाणावर दुर्लक्ष होत आहे. तरी यबाबत कारवाई होउन शहरांसाठी पाणीपुरवठा शिल्लक ठेवण्यांसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.