|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » साळगाव येथे 7 रोजी जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धा

साळगाव येथे 7 रोजी जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धा 

वार्ताहर/ कुडाळ

तालुक्यातील साळगाव येथील श्री माऊली फिटनेस ग्रुपच्यावतीने ‘साळगाव श्री 2017’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा साळगाव हायस्कूलच्या पटांगणावर 7 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 55 ते 60, 60 ते 65, 65 ते 70, 70 ते 75 व 75 वरील अशा पाच वजनी गटात खेळविली जाणार आहे. स्पर्धेतील ‘साळगाव श्री 2017’ विजेत्यास रोख बक्षीस व चषक, मानाचा जरीपट्टा व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बेस्ट पोझर व मोस्ट इम्प्रूव्हड निवडण्यात येणार आहे. त्यांना रोख बक्षिसे देण्यात येतील. अधिक माहितीसाठी तेजस पाटकर, मोबा-8806726467 यांच्याशी संपर्क साधावा.

 

 

 

 

Related posts: