|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » Top News » मोदींच्या उत्तरप्रदेशातील परिवर्तन रॅलीआधी रेल्वे अपघाताचा कट?

मोदींच्या उत्तरप्रदेशातील परिवर्तन रॅलीआधी रेल्वे अपघाताचा कट? 

ऑनलाइन टीम / लखनऊ :

     पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परिवर्तन महारॅलीआधी रेल्वे अपघाताचा कट रचला गेला होता का? असे सवाल सध्या सोशल मीडीयावर उपस्थित केला जात आहे. शनिवारी कानपूरमधील मंधना येथे काही अज्ञात लोकांनी रेल्वे रुळ कापण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर सोशल मिडीयावर हे प्रश्न विचारले जात आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यामागे कट असल्याची शंका ट्विटच्या माध्यमातुन मान्य केली आहे.

   रविवारी रात्री अंकुर सिंग नावाच्या व्यक्तीने हे ट्विट केले होते, ‘लखनऊत मोदींच्या रॅलीआधी रेल्वे अपघाताचा कट होता. गेल्या वेळेस झालेला रेल्वे अपघातही मोदींचा कार्यक्रम सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी झाला होता’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे . सुरेश प्रभू यांनी या ट्विटला उत्तर देत या कटाची शंका मान्य केली.

 

Related posts: