|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांना ‘टिळक पुरस्कार’

ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांना ‘टिळक पुरस्कार’ 

पुणे / प्रतिनिधी : 

केसरी-मराठा संस्था आणि  टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांना जाहीर झाला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांनी ही माहिती दिली.

एक लाख रूपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 4 जानेवारी रोजी केसरीच्या 136 व्या वर्धापनदिनी डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते  हा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा टिळक वाडय़ाच्या प्रांगणात होणार आहे. यंदाचे पुरस्काराचे नववे वर्ष आहे. यापूर्वी वीर संघवी, एन. राम, एच के दुआ, विनोद मेहता, शेखर गुप्ता यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्काराबरोबरच ‘कै. जयंतराव टिळक स्मृती पुरस्कारां’चे वितरणही होणार आहे. अनाथ हिंदू महिलाश्रम, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था आणि वसंत व्याख्यानमाला या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येईल.

Related posts: