|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सीएनजीच्या वापरासाठी मुंबईने पुढाकार घ्यावा

सीएनजीच्या वापरासाठी मुंबईने पुढाकार घ्यावा 

पेंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन

दहिसर / प्रतिनिधी

जगात इंधनयुक्त वायूचा वापर हा 24 टक्के होतो, तर भारतात हे प्रमाण फक्त 6 टक्के आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त आणि स्वस्त असलेल्या सीएनजीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने पुढाकार घ्यावा.असे आवाहन पेंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) धर्मेंद्र प्रधान यांनी आज बीकेसी येथे केले.आजही अनेक मुंबईकराकडे एलपीजी गॅस सिलिंडर नाही. त्यामुळे येत्या दोन वर्षांत मुंबईसह देशात सीएनजी आणि एलपीजीचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पावभाजीच्या गाडीवर सीएनजीयुक्त पावभाजी मिळेल, असा फलक पावभाजी गाडीवाला अभिमानाने सांगेल, असेही प्रधान यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण स्नेहीइंधनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल)ने मेसर्स इको फ्युएल (लोवाटो, इटलीचे भारतीय भागीदार) यांच्या भागीदारीतून सीएनजी इंधनयुक्त दुचाकी बाजारात आणल्या आहेत. सीएनजी इंधनयुक्त दुचाकीचे बीकेसीतील महानगर गॅस लिमिटेड कार्यालयासमोर अनावरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, स्थानिक खासदार पूनम महाजन, एमजीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. सी. त्रिपाठी, एमजीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव माथूर, संचालक राजेश पांडे, मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर, ऑटोगॅस रिट्रोफीटर असोसिएशनचे अध्यक्ष व लोवाटो किटचे कंपनी आऊटलेट मालक रवी जायस्वाल  आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर 25 सीएनजी किटयुक्त लोवोटा दुचाकी स्कूटींना त्यांनी झेंडा दाखवला.याबाबत जनजागफती करण्यासाठी सरकारने मदत करावी तसेच पंपावर दुचाकीसाठी वेगळ्या नोझल्सची व्यवस्था करावी अशी मागणी जायस्वाल यांनी केली याबाबत लवकरच ते  पेंद्रीय मंर्त्यांची  भेट घेणार आहेत.

धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले की, या सीएनजीयुक्त दुचाकीचा फायदा मुंबई महानगर प्रदेशातील 36 लाखांपेक्षा जास्त दुचाकी वाहनांना होऊ शकेल. कारण महानगरातील सीएनजीच्या वाहनांची संख्या 70 टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे, खासदार पूनम महाजन यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सीएनजी किट बसवलेल्या दुचाकी वाहनधारकाना काही सूट देता येईल का, याचा विचार एमजीएलने व गेलने करावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, दिल्लीनंतर मुंबई उपनगरात हा वेगळा उपक्रमाची भर पडली आहे. जे विद्यार्थी अशा ग्रीन एनर्जी प्रणालीचा वापर आपल्या दुचाकी वाहनांमध्ये करतील त्या पर्यावरण रक्षक विद्यार्थ्याना अंतिम परीक्षेत जास्त गुण देण्याचा शिक्षण विभाग निश्चित विचार करेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षेत देखील या वाढीव गुणांचा त्यांना फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही प्रणाली किफायतशीर आणि स्वस्त असून, पेट्रोलला एका लिटरसाठी 1.20 पैसे खर्च तर वायूवर आधारित या इंधनाच्या एका लिटरसाठी 60 पैसे खर्च येतो. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणार्या या प्रणालीचा प्रसार मुंबईसह महाराष्ट्रात होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts: