|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » 3 हजार कोटीचे भांडवल बँका बाजारातून उभारणार

3 हजार कोटीचे भांडवल बँका बाजारातून उभारणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची भांडवली क्षमता वाढविण्यासाठी बाजारातून पैसे गोळा करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. 12 सरकारी बँका समभागांच्या माध्यमातून साधारण 3 हजार कोटी रुपये गोळा केले जाणार आहेत.

अर्थ मंत्रालयाने 12 बँकांना 2,914.038 कोटी रुपये उभारण्यास मंजुरी दिली. युनियन बँक ऑफ इंडियाला क्यूआयपी माध्यमातून 200 कोटी रुपये उभारता येणार आहेत. 2015-16 या आर्थिक वर्षात 19 सरकारी बँकांत 25 हजार कोटी रुपये सरकारने ओतले होते. 2016-17 या आर्थिक वर्षात 25 हजार कोटी रुपये देण्याचे सरकारने अर्थसंकल्पावेळी म्हटले होते. यापैकी 13 सरकारी बँकांत 19 जुलै 2016 रोजी 22,915 कोटी रुपये दिले होते. बँकांना 75 टक्के रक्कम देण्यात आली असून उर्वरित रक्कम बँकांच्या कामगिरीनुसार देण्यात येणार आहे, असे अर्थ विभागाने म्हटले.

पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत 26.03 कोटी बँक खाती उघडण्यात आली. यापैकी 15.86 कोटी ग्रामीण आणि 10.17 कोटी नागरी भागात उघडण्यात आली. या योजनेंतर्गत 19.93 कोटी रुपे डेबिट कार्ड्स आणि 71,557.90 कोटी जमा करण्यात आले. 14.43 कोटी खात्यांची आधारबरोबर जोडणी करण्यात आली. 28 डिसेंबरपर्यंत पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेखाली 3.08 कोटी आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेखाली 9.88 कोटी अर्ज करण्यात आले आहेत.