|Saturday, April 20, 2019
You are here: Home » उद्योग » सीएनजी इंधनयुक्त दुचाकींचे मुंबईत अनावरण

सीएनजी इंधनयुक्त दुचाकींचे मुंबईत अनावरण 

वृत्तसंस्था/ मुंबई

आपल्या पर्यावरणस्नेही इंधनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने मेसर्स इको फ्युएल (लोवाटो, इटलीचे भारतीय भागीदार) यांच्या भागीदारीत सीएनजी इंधनयुक्त दुचाकी बाजारात आणल्या असून त्याद्वारे सुरक्षित व परवडणाऱया दरातील इंधनावर चालवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. तसेच, प्रदूषणमुक्त वातावरणात योगदान दिले आहे.

हे अनावरण केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) धर्मेंद्र प्रधान यांनी मुंबईत केले आणि अध्यक्षस्थानी विनोद तावडे,  शिक्षण, युवा, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबई उपनगराचे पालकमंत्री हे होते.  धर्मेंद्र प्रधान यांनी ई-वॉलेट पेमेंटचेही उद्घाटन केले. ज्याचा वापर सीएनजी भरताना करता येईल आणि त्यातून भारताला कॅशलेस अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने सहकार्य आणि मदत केली जाईल.

या कार्यक्रमाचे आयोजन इतर मान्यवरांच्या उपस्थितीत केले गेले, ज्यात  खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, आमदार तृप्ती प्रकाश सावंत, राजेश पांडे, संचालक एमएनजीएल, बी. सी. त्रिपाठी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक-गेल (इंडिया) लिमिटेड आणि राजीव माथुर, व्यवस्थापकीय संचालक-एमजीएल यांचा समावेश होता. यानिमित्ताने बोलताना, धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, ‘सीएनजी इंधनाने भरलेल्या दुचाकींच्या अनावरणामुळे मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) 36 लाखांपेक्षा अधिक दुचाकींना या पर्यावरणस्नेही इंधनाची निवड करता येईल, असे विचार  प्रधान यांनी व्यक्त केले.

मागील काही वर्षांमध्ये मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीयुक्त वाहनांची संख्या सीएनजीची इंधन अर्थव्यवस्था आणि पर्यावरणस्नेही प्रकार पाहता 70 टक्क्यापेक्षा अधिक सीएजीआरने वाढली आहे.

दुचाकीमधील सीएनजी किटमध्ये प्रत्येकी 1.2 किलोची सीएनजी सिलेंडर असून ती सुमारे 0.60 रुपये प्रति किमी प्रत्येकी भरण्यावर सुमारे 120 ते 130 किमी प्रतिकिलो चालू शकते आणि किट उत्पादकानुसार सध्याच्या किमतीच्या पातळीनुसार त्याच पद्धतीच्या पेट्रोलवर चालणाऱया वाहनांच्या तुलनेत तितकीच स्वस्तही होण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, या स्कूटर्सना लोवाटोने उत्पादित केलेल्या सीएनजी किटने सुसज्ज करता येईल.

सध्या दोन किट उत्पादक म्हणजे मेसर्स आयटक आणि मेसर्स लोवाटो यांनी एआरएआय, पुणे आणि आयकॅट, गुरगाव यांनी अनुक्रमे मान्यताप्राप्त दुचाकी सीएनजी किट तयार केले आहेत. लोवाटोल बाजारात उपलब्ध असलेल्या विविध ओईएम्सच्या 18 स्कूटर्स मॉडेल्सना मान्यता मिळाली आहे. या वर्गात असलेल्या मोठय़ा संधींचा विचार करता इतर किट उत्पादकही आपले दुचाकी किट आणण्याच्या योजना बनवत आहेत.

Related posts: