|Sunday, November 18, 2018
You are here: Home » उद्योग » नोटाबंदीमुळे डिसेंबरमध्ये उत्पादन क्षेत्रात घट

नोटाबंदीमुळे डिसेंबरमध्ये उत्पादन क्षेत्रात घट 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका उद्योग क्षेत्राला बसला असून, गेल्या महिन्याभरात येथे मंदीचे वातावरण आहे. डिसेंबर 2016 मध्ये उत्पादन क्षेत्रालाही याची मोठी झळ पोहोचली आहे. मासिक पीएमआय सर्व्हेनुसार, 2016 मध्ये प्रथमच डिसेंबर महिन्यादरम्यान नवीन ऑर्डर्स आणि उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. गेल्या महिन्यात निक्केई मार्केट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्सचे इंडेक्स (पीएमआय) 49.6 वर आला आहे. नोव्हेंबरमध्ये ही आकडेवारी 52.3 होती. पीएमआयची आकडेवारी 50 पेक्षा कमी असणे म्हणजे त्या क्षेत्रातील मंदीचे वातावरण दर्शविते, असा तज्ञांचा अंदाज आहे.

8 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने अचानक नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर 2016 च्या अखेरीस उत्पादन क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात घसरण झाली आहे. नोटबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनतुटवडय़ाचा हा परिणाम आहे.   कंपन्यांची खरेदी आणि रोजगाराचा निर्देशांक यामध्ये घसरण झाल्याचे चित्र आहे. मोठय़ा किमतीच्या नोटा बंद झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत चलनतुटवडा पहावयास मिळाला. यामुळेच नव्या ऑर्डर्समध्ये प्रचंड प्रमाणात घट झाल्याची स्थिती आहे.

Related posts: