|Sunday, July 21, 2019
You are here: Home » उद्योग » नववर्षातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी घसरण

नववर्षातील कामकाजाच्या पहिल्या दिवशी घसरण 

मिडकॅप, स्मॉलकॅप समभागांची चांगली कामगिरी

वृत्तसंस्था/ मुंबई

2017 सालच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी देशातील शेअरबाजारात मोठा उतार-चढाव दिसून आला. बाजारांचा प्रारंभ वधारासह सुरू झाला, परंतु ही वृद्धी अधिक काळ टिकू शकलेली नाही. सोमवारच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये तेजी कायम राहिली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वधारला. तर निफ्टीच्या मिडकॅप निर्देशांकात जवळपास 1 टक्क्यांची मजबुती आली. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांपेक्षा अधिक वधारला.

बँकिंग, आयटी आणि एफएमसीजी समभागांमध्ये विक्रीमुळे बाजारात दबाव दिसून आला. बँक निफ्टी 1.15 टक्क्यांनी घसरून 17970 अंकांवर बंद झाला, तर निफ्टीच्या पीएसयू बँक निर्देशांकात 2 टक्क्यांची कमजोरी आली. निफ्टीच्या आयटी निर्देशांकात 0.3 टक्के आणि एफएमसीजी निर्देशांकात 0.25 टक्क्यांची घसरण झाली. परंतु ऑटो, मेटल, फार्मा, कॅपिटल गुड्स, कंझ्युमर डय़ुरेबल्स, ऑईल अँड गॅस, पॉवर आणि रियल्टी समभागांमध्ये चांगली खरेदी आढळली.

मुंबई शेअरबाजार निर्देशांक 31 अंक म्हणजेच 0.1 टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह 26595.5 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजार निर्देशांक 6 अंक म्हणजेच 8179.5 अंकांवर बंद झाला.

सोमवारच्या व्यावसायिक सत्रात दिग्गज समभागांमध्ये एचडीएफसी, बँक ऑफ बडोदा, एसबीआय, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज ऑटो आणि इन्फोसिस हे 1.1-3.6 टक्क्यांनी कमजोर झाले. परंतु अंबुजा सिमेंट, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि अदानी पोर्ट्स 2.1-4 टक्क्यांनी वधारले.

मिडकॅपमध्ये सुधारणा

मिडकॅप समभागांमध्ये ओबेरॉय रियल्टी, इंडियाबुल्स हाउसिंग, बजाज फायनान्स, श्रीराम सिटी आणि श्रीराम टान्सपोर्ट सर्वाधिक 3.9-6.75 टक्क्यांनी मजबूत झाले. स्मॉलकॅप समभागांमध्ये कोलते-पाटील, एमएमटीसी, पोद्दार हाउसिंग, ड्रेजिंग कॉर्प आणि धामपूर शुगर सर्वाधिक 13.1-20 टक्क्यांनी मजबूत झाले.