|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी जिह्यातील 100 गावे होणार ‘पॅशलेस’

रत्नागिरी जिह्यातील 100 गावे होणार ‘पॅशलेस’ 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पॅशलेस व्यवहाराचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी बँकांना सुचना दिल्या आहेत. त्यानूसार रत्नागिरी जिह्यातील 100 गावे पॅशलेस करण्याची जिह्यातील प्रमुख बँकाकडे पावले उचलली आहेत. पहिल्या टप्प्यात 26 जानेवारीपर्यंत सुमारे 32 गावे पॅशलेस होणार आहेत. नोटबंदीच्या निर्णयानंतर जिह्यातील बँकांकडे 500 व 1000 च्या 1500 कोटी मुल्याच्या नोटा जमा झाल्या आहेत. त्या बदल्यात 700 कोटीच्या नवीन नोटा प्राप्त झाल्याची माहिती बँकेच्या सुत्रांकडून सांगण्यात आली.

देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून बंद करण्यात आल्या आहेत. त्या नोटा 31 डिसेंबर 2016 पर्यंत बँकांकडे जमा करण्याच्या सूचना होत्या. या निर्णयानंतर देशभरात गदारोळ माजला होता. ग्रामीण भागांसह महानगरांमध्ये त्यांचे पडसाद उमटले. जुन्या नोटांऐवजी दोन हजार रुपयांची नवीन नोट चलनात आणली गेली. सुट्टे पेसे मिळवण्यासाठी नागरिकांची पंचाईत झाली होती. 50 दिवसानंतर ही परिस्थिती सुधारेल असा दावा केला जात होता. मात्र आजही अनेक ठिकाणी सुट्टे पैसे मिळविण्यासाठी लोकांची गर्दी दिसते.

नोटांचा वापर कमी करुन त्याऐवजी पॅशलेस व्यवहारावर भर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कडक पावलेही उचलली जात आहेत. ग्रामीण भागामध्ये ही यंत्रणा सक्षम करण्यासाठी बँकांची मदत घेतली जाणार आहे. तशा सूचना जिल्हास्तरापर्यंत पोहचल्या आहेत. रत्नागिरी जिह्यातील 100 गावे पॅशलेस करण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाकडून नुकतेच बँकांना दिले आहेत. बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यासारख्या मोठय़ा बँकांना प्रत्येकी पाच गावे पॅशलेस करण्याची जबाबदारी दिली आहे. तर छोटय़ा बँकांना तीन गावे पॅशलेस करावयाची आहेत.

बँकांनी त्या-त्या गावांमध्ये जाऊन पॅशलेससाठी पावले उचलली आहेत. बँक ऑफ इंडियाकडून निवळीत प्रयोग सुरु केला आहे. सुरवातीला गावातील छोटय़ा व्यवसायिकांना स्वाईप मशिन आणि ऍपची माहिती दिली जात आहे. दैनंदिन वापरात याचा वापर ग्राहकांकडून पैसे स्वीकारण्यासाठी केला जाणार आहे. स्वाईप मशिनचा तुटवडा असल्याने ऍपच्या वापरावर भर दिला जात आहे. या व्यवहारासाठी ‘चिल्लर’ नावाचे ऍप विकसित केले आहे. या ऍपद्वारे कोणत्याही बँकेचा ग्राहक पैसे अदा करु शकतो. त्याची माहिती प्रत्येक व्यवसायिकाकडे दिली आहे. पुढील टप्प्यात गावातील तरुणांना याचे प्रशिक्षण दिले जाईल. ऍपचा वापर कसा करायची याची माहिती त्यांना दिली जाणार आहे. ते पॅशलेस व्यवहाराचा प्रसार गावामध्ये करु शकतील. 26 जानेवारीपर्यंत 32 गावे पॅशलेस होतील यादृष्टीने पावले उचलण्यात आली असल्याचे बँकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

जुन्या नोटा बंदी लागू झाल्यानंतर 50 दिवसांमध्ये जिह्यातील बँकांकडे सुमारे 1500 कोटीच्या 500, 1000 रुपयांच्या नोटा जमा झाल्याचे सांगितले जात आहे. त्या बदल्यात बँकांना 700 कोटी रुपयांचे नवीन चलन प्राप्त झाले आहे. तसेच पाचशे रुपयांच्या सुमारे 15 कोटीच्याच नोटा जिह्यात आल्याने व्यवहार सुरळीत होण्यामध्ये अडथळे आहेत. नोटबंदीनंतर सध्या स्थिती सुधारली असली तरीही सुट्टया पैशांच्या नावाने नाग†िरकांमध्ये आजही शिमगा सुरु आहे. या निर्णयानंतर घरामध्ये ठेवलेला पैसा बँकेत दाखल झाला आहे. हा पैसा चलनात आल्याने व्यवहार सुरळीत होत असल्याचा दावा बँकांचे अधिकारी करत आहेत.

Related posts: