|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरीत ‘नृत्यार्पण’ भरतनाटय़म् शास्त्राrय नृत्य वर्ग

रत्नागिरीत ‘नृत्यार्पण’ भरतनाटय़म् शास्त्राrय नृत्य वर्ग 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीतील युवा भरतनाटय़म् नृत्यांगना प्रणाली तोडणकर आता रत्नागिरीत स्वतःचा ‘नृत्यार्पण’ शास्त्राrय नृत्यवर्ग सुरू करत आहे. बुधवारी 4 जानेवारी रोजी  स्वयंवर मंगल कार्यालयात सायंकाळी 5 वाजता ‘नृत्यार्पण शास्त्राrय नृत्यवर्ग’चे उद्घाटन होणार आहे. वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱया कोल्हापूरच्या प्रख्यात शास्त्राrय नृत्यांगना संयोगिता पाटील यांच्या हस्ते या नृत्यवर्गचे उद्घाटन होणार असल्याची माहिती प्रणाली तोडणकर हिने दिली.

या उद्घाटन सोहोळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री स्वामी समर्थ मठ गावखडीचे श्री दिगंबरदास, नगराध्यक्ष राहुल पंडित, सामाजिक कार्यकर्त्या सौ. जया सामंत, कथ्थक अलंकार सौ. शिल्पा मुंगळे, मुंबईच्या भरतनाटय़म् विशारद सौ. वैशाली फडके यांची उपस्थिती असणार आहे.

‘नृत्यार्पण’ नृत्यवर्गचे उद्घाटन करणाऱया संयोगिता पाटील ह्या प्रख्यात भरतनाटय़म् नृत्यांगना आहेत. 4 ते 7 डिसेंबर 2008 साली कोल्हापूरमध्ये त्यांनी सलग 66 तास भरतनाटय़म् नृत्य करून ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. तसेच त्याआधी त्यांनी 29 जुलै 2004 मध्ये कोल्हापूरमध्ये सलग 13 तास भरतनाटय़म् नृत्य सादर केले होते. त्यांना नृत्यचंद्रिका, नृत्य सरस्वती, नृत्य तपस्वी असे पुरस्कार प्राप्त आहेत.

तर रत्नागिरीमध्ये भरतनाटय़म्चा नृत्यवर्ग सुरू करणारी प्रणाली तोडणकर हि स्वतः भरतनाटय़म्मध्ये पारंगत आहे. सध्या ती संयोगिता पाटील यांच्याकडे विशारद तृतीयचे शिक्षण घेत आहे. याआधी प्रणालीने रत्नागिरीतील भरतनाटय़म् नृत्यांगना सौ. मिताली भिडे यांच्याकडे विशारद द्वितीयपर्यंतचे शिक्षण घेऊन अरंगेत्रम सादर केले आहे. अशाप्रकारे रत्नागिरीत अरंगेत्रम् करणारी प्रणाली ही पहिली नृत्यांगना आहे. याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या डिप्लोमामध्येही प्रथम येण्याचा मान प्रणालीने पटकावला आहे.

‘नृत्यार्पण’ शास्त्राrय वर्गच्या उद्घाटन सोहोळ्याला नृत्यप्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन प्रणाली तोडणकर हिने केले आहे.

शास्त्राrय नृत्यात रूचीसाठी ‘नृत्यार्पण’

रत्नागिरीत भरतनाटय़म्चा प्रचार, प्रसार व्हावा, येथील विद्यार्थ्यांमध्ये भरतनाटय़म्ची रूची अधिक वाढावी, यासाठी स्वतःचा नृत्यवर्ग सुरू करत आहे. शास्त्राrय नृत्यामध्ये रूची असणाऱया इच्छुकांनी, त्यांच्या पालकांनी ‘नृत्यार्पण शास्त्राrय नृत्यवर्ग’मध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन भरतनाटय़म् नृत्यांगना प्रणाली तोडणकर हिने केले आहे. प्रवेशासाठी 8600875571 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: