|Saturday, April 20, 2019
You are here: Home » उद्योग » इंडिया इंटरनॅशनल एक्स्चेंज लवकरच येणार

इंडिया इंटरनॅशनल एक्स्चेंज लवकरच येणार 

वृत्तसंस्था/ मुंबई
आशियातील सर्वात जुन्या स्टॉक एक्स्चेंज बीएसईचा इंडिया इंटरनॅशनल एक्स्चेंज गुजरातमध्ये लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या सणानंतर तो सुरू करण्याची शक्यता आहे. पहिल्या सहा महिन्यासाठी केवळ डेरिव्हटिव्ज उत्पादनांचा व्यवहार होणार आहे.
इंडिया इंटरनॅशनल एक्स्चेंजची मालकी बीएसईकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 जानेवारी रोजी या एक्स्चेंजचे उद्घाटन करण्यात येईल. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक गिफ्ट हे शहर देशातील पहिले इंटरनॅशनल फायनान्सियल सर्व्हिसेज सेंटर आयएफएससी म्हणून ओळखण्यात येईल. 14 जानेवारी रोजी साजऱया होणाऱया मकर संक्रांती सणानंतर या एक्स्चेंजमध्ये टेडिंग सुरू करण्यात येईल. पहिल्या सत्रात इक्विटी, चलन आणि कमोडिटीज् यासारख्या डेरिव्हटिव्ज् उत्पादनांचे ट्रेडिंग करण्यात येणार. यानंतर डिपॉझिटरी रिसिप्ट आणि बाँडची सुरुवात करण्यात येणार आहे असे बीएसईचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी सांगितले.
दुसऱया टप्प्याची सुरूवात करण्यासाठी साधारण सहा महिने ते एक वर्ष कालावधी लागण्याची शक्यता आहे. आवश्यक असणाऱया पायाभूत सुविधा सुरू करण्यात आल्यानंतर सेवा वाढविण्यात येईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर सेवा सुरू करण्यासाठी आणि समजण्यासाठी काही काळ वेळ लागण्याचा अंदाज आहे. एक्स्चेंजवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राधिकरण असणे गरजेचे आहे. पैशांची अफरातफर आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी पावले उचलण्यात येतील असे त्यांनी म्हटले.

Related posts: