|Saturday, October 20, 2018
You are here: Home » उद्योग » स्टेट बँक-कोकाकोला यांच्यात सामंजस्य करार

स्टेट बँक-कोकाकोला यांच्यात सामंजस्य करार 

किरकोळ विपेते, वितरकांना व्यावसायिक व्यवहार डिजिटल स्वरुपात करण्यास होणार मदत

मुंबई

: 2.6 दशलक्षांहून अधिक किरकोळ विपेते आणि 5,000 वितरकांना व्यावसायिक व्यवहार डिजिटल स्वरुपात करण्यास सक्षम करण्यासाठी हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रा. लि. (एचसीसीबीपीएल), स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि कोकाकोला इंडिया प्रा. लि. (सीसीआयपीएल) यांनी धोरणात्मक भागीदारी केल्याची घोषणा करण्यात आली.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य आणि एचसीसीबीपीएलचे अध्यक्ष संचालक टी. कृष्णकुमार यांनी या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱया केल्या. एसबीआयच्या बडी पी2पी, बडी मर्चंट ऍप, एसबीआय पे या डिजिटल पर्यायांचा वापर करण्यास उद्युक्त करून व त्याची अंमलबजावणी करून डिजिटायझेशन प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे या करारात नमूद करण्यात आले आहे. हे परिवर्तन सुलभ व्हावे यासाठी एसबीआयच्या अधिकृत प्रशिक्षकांप्रमाणेच कोको-कोलासुद्धा या नव्या आणि बदलणाऱया डिजिटल व्यवसाय व्यवहार सोल्युशन्सबद्दल किरकोळ विपेत्यांना प्रशिक्षित करणार आहे.

सामंजस्य करारावर स्वाक्षऱया समारंभात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या, “आपल्या सन्माननीय पंतप्रधानांच्या व्हिजनला प्रतिसाद देत दोन अग्रणी संस्था संयुक्तपणे प्रयत्न करणार असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘बडी’, ‘एसबीआय पे’ आणि ‘स्टेट बँक कलेक्ट’ यासारखे आमचे डिजिटल प्लॅटफॉर्म ग्राहकांना व्यवहार करण्याचे अत्यंत सुलभ आणि सुविधाजनक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. त्याचप्रमाणे वित्त उत्पादनांसाठी नवे ग्राहक जोडण्यासाठी या प्लॅटफॉर्मची मदत होते.’’ याप्रसंगी श्री. कृष्णकुमार म्हणाले, “भारताला डिजिटल माध्यमात सक्षम करणाऱया सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ व्हिजनची आम्हाला जाणीव आहे आणि आमचा त्याला पाठिंबा आहे. डिजिटल सोल्युशन क्षेत्रात आम्ही अग्रणी आहोत आणि आमच्याकडून आमच्या पुरवठादारांना केली जाणारी पेमेंट आणि आमच्या भागीदारांकडून आम्हाला मिळणाऱया रकमेपैकी 90 टक्के रक्कम ‘डिजिटाइज्ड’ स्वरुपात मिळते. आम्हाला ही सुविधा बाजारातील प्रत्येक किरकोळ विपेत्यापर्यंत पोहोचवायची आहे. एसबीआयसोबत आमची हातमिळवणी हे त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. व्यावसायिक व्यवहारांमध्ये डिजिटल पेमेंट सोल्युशन्सचा अंतर्भाव केल्यामुळे आमची रिटेल चेन इकोसिस्टिम अधिक भक्कम होणार आहे. यात 2.6 दशलक्ष किरकोळ विपेते आणि 5,000 वितरकांचा समावेश आहे आणि त्यामुळे आमचे रोख रकमेवरील अवलंबित्व बऱयाच अंशी कमी होणार आहे. ई-कॉमर्स आणि एम-कॉमर्स क्षेत्रात खूप क्षमता आहे आणि या वेगाने प्रगती करणाऱया क्षेत्रांमध्ये एचसीसीबीपीएल आणि एसबीआयच्या या भागीदारीने दीर्घकालीन लाभ होणार आहे.’’

Related posts: