|Thursday, May 23, 2019
You are here: Home » उद्योग » टाटा मोटर्सकडून जेनॉन योद्धा दाखल

टाटा मोटर्सकडून जेनॉन योद्धा दाखल 

नवी दिल्ली :

  टाटा मोटर्सने नववर्षाच्या पहिल्याच सप्ताहात नवीन गाडी भारतीय बाजारात सादर केली. कंपनीने अलीकडेच नियुक्त केलेला सदिच्छादूत आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या उपस्थितीत पिकअप वाहन जेनॉन योद्धा बाजारात आणल्याची घोषणा कंपनीने केली. ही नवीन गाडी सिंगल कॅप आणि डबल कॅप अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. या गाडीची किंमत 6.05 लाखापासून सुरू होते.

या गाडीला तीन डिझेल इंजिनांचा वापर करण्यात आला असून ती बीएस-3 आणि बीएस-4 या पर्यावरण मानकांची पूर्तता करतात. याचबरोबर 145 बीएचपी क्षमतेसोबत 320 एनएमचा टॉर्क देतात. या गाडीचे दमदार इंजिन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनयुक्त आहे, असे कंपनीने सांगितले. गाडीमध्ये ऍडजस्टेबल स्टीअरिंगचा वापर करण्यात आला असून ती 1,250 किलोगॅमपर्यंत वजन उचलू शकते. भविष्यातील परिवहन वाहनांचा विचार करत ही गाडी डिझाईन करण्यात आले असे कंपनीने म्हटले.

Related posts: