|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सावित्रीबाईंनी ज्ञानाचा सूर्य तेवत ठेवला

सावित्रीबाईंनी ज्ञानाचा सूर्य तेवत ठेवला 

बेळगाव / प्रतिनिधी

ज्या काळात महिला घरातून बाहेर पडत नव्हत्या त्या काळात सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाचा धडा देवून क्रांती घडविली. प्रस्थापित समाजाची बंधने झुगारून त्यांनी ज्ञानाचा सूर्य तेवत ठेवला. त्यामुळे आज महिला शिक्षणाची कास धरून उच्चपदावर कार्यरत आहेत, असे विचार कॉ. अनिल आजगावकर यांनी व्यक्त पेले. 

येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 186 व्या जयंतीनिमित्त वाचनालयाच्या कै. लक्ष्मी जोग सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून कॉ. अनिल आजगावकर यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर सरिता पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष ऍड. नागेश सातेरी, उपाध्यक्ष नेताजी जाधव, कार्यवाह अनंत लाड, सहकार्यवाहक अनंत जांगळे उपस्थित होते.

पुण्याच्या कर्मठ भूमीत सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाचे काम सुरू केले. यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. प्रसंगी दगड, चिखल, शेण अंगावर झेलत होत्या. परंतु त्यांनी शिक्षणाचे व्रत सोडले नाही. यासाठी त्यांना मोलाची मदत झाली ती त्यांचे पती ज्योतीरावांची, असे आजगावकर यांनी सांगितले.

महापौर सरिता पाटील म्हणाल्या, सावित्रीबाईंमुळेच आज महिला स्वाभिमानाने फिरू शकतात. त्यांनी केलेले कार्य हे महिलांसाठी दीपस्तंभासारखे आहे. आजही काही मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे तसेच इतर कारणांमुळे शिक्षण घेता येत नाही. अशा मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम आता आपण केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Related posts: