|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » निवडणूकीचा डंका वाजला ; यूपीत सात टप्प्यात निवडणूक होणार

निवडणूकीचा डंका वाजला ; यूपीत सात टप्प्यात निवडणूक होणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पाच राज्यांत होणाऱया आगामी विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी जाहीर केला. येत्या काळात या निवडणुका होणार असल्याने आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली.

दिल्ली येथे निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी ही माहिती दिली. येत्या काही महिन्यात उत्तरप्रदेश, पंजाब, गोवासह पाच राज्यांचा विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यातच आज निवडणुकींच्या तारखादेखील जाहीर झाल्या आहेत.

यामध्ये उत्तरप्रदेशमध्ये सात टप्प्यात निवडणुक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. या निवडणुकीत 16 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाच राज्यातील 690 जागांसाठी मतदान होणार आहे. गृह मंत्रालयकडून या पाच राज्यांमध्ये निवडणुकीदरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पंजाब आणि गोव्यात 4 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, मणिपूर मध्ये दोन टप्पयात निवडणूक होणार आहे. याच पहिला टप्पा 4 मार्चला तर दुसरा टप्पा 8 मार्चला होणार आहे. उत्तराखंडमध्ये 15 फेब्रुवारीला होणार आहे. देशाचे लक्षवेधणाऱया उत्तप्रदेशचे निवडणुक सात टप्प्यात होणार आहे . पहिला टप्पा 11 फेब्रुवारीला, दुसरा टप्पा 15फेब्रुवारीला, तिसरा टप्पा 19 फेब्रुवारीला, चौथा टप्पा 23 फेब्रुवारीला, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारीला तर शेवटचा टपा 4 आणि 8 मार्च होणार आहेत. या पाचही राज्याचा निकाल 11 मार्चला लागणार आहे. आजपासून पाच राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.