|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » नवज्योतसिंह सिद्धू काँग्रेसच्या तिकिटावर लढणार निवडणूक

नवज्योतसिंह सिद्धू काँग्रेसच्या तिकिटावर लढणार निवडणूक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

माजी राज्यसभा सदस्य आणि ‘आवाज-ए-पंजाब’ पक्षाचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू हे पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत अमृतसर पूर्वमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवज्योतसिंह सिद्धू यांनी भाजपला रामराम ठोकत राज्यसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी ‘आवाज-ए-पंजाब’ हा नवा पक्ष स्थापन केला. सिद्धू हे त्यांनी स्थापन केलेल्या ‘आवाज-ए-पंजाब’ या पक्षातून ते निवडणूक लढवतील असे वाटत होते. मात्र, ते आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी नवज्योत कौर यांच्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related posts: