|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » निडवणूक तारखांच्या घोषणेनंतरही घसरण

निडवणूक तारखांच्या घोषणेनंतरही घसरण 

बीएसईचा सेन्सेक्स 10, एनएसईचा निफ्टी 2 अंशाने घसरला

वृत्तसंस्था / मुंबई

बुधवारी घरगुती बाजारात सुस्ती आल्याने सीमित प्रमाणात क्यवहार दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठय़ा प्रमाणात काही वाढ झाली नव्हती. निफ्टी 40 अंश आणि सेन्सेक्स 120 अंशादरम्यान वर-खाली होत राहिला. दिवसाच्या अखेरीस निफ्टी 8,200 आणि सेन्सेक्स 26,500 दरम्यान बंद झाला.

बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 10 अंशाने घसरत 26,633 वर बंद झाला. एनएसईचा 50 समभागांचा प्रमुख निर्देशांक 2 अंशाने घसरत 8,190 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात मजबूती दिसून आली. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारत बंद झाला. बीएसईचा मिडकॅप निर्देशांकात सुस्ती दिसून आली. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाला.

बँकिंग आणि ऑईल ऍन्ड गॅस समभागात विक्री झाल्याने दबाव दिसून आली. बँक निफ्टी 0.8 टक्क्यांनी घसरत 17,891 वर बंद झाला. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 0.8 टक्के आणि खासगी बँक निर्देशांक 0.9 टक्क्यांनी घसरत बंद झाले. बीएसईचा ऑईल ऍन्ड गॅस निर्देशांकात 0.5 टक्क्यांनी कमजोरी आली.

आयटी, ऑटो, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स आणि ग्राहकोपयोगी वस्तू समभागात चांगली खरेदी दिसून आली. निफ्टीचा आयटी निर्देशांक 1.3 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.3 टक्के आणि ऑटो निर्देशांक 0.3 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा कॅपिटल गुड्स निर्देशांकात 0.7 टक्के आणि ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 1.2 टक्क्यांनी तेजी आली.

दिग्गज समभागांची कामगिरी

कोटक महिंद्रा बँक, बॉश, रिलायन्स इन्डस्ट्रीज, एसीसी, अंबुजा सिमेंट, आयसीआयसीआय बँक, सिप्ला, हिंदुस्थान युनि, एसबीआय 2.3-0.8 टक्क्यांनी घसरले. भारती इन्फ्राटेल, भारती एअरटेल, एचसीएल टेक, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, भेल, विप्रो आणि हीरो मोटो 3.5-1.1 टक्क्यांनी वधारले.

मिडकॅप समभागात एमआरपीएल, अशोक लेलँड, कंसाई नेरोलॅक, टायटन आणि अदानी पॉवर 5.3-2.9 टक्क्यांनी वधारत बंद झाले. स्मॉलकॅप समभागात ज्युबिलंट लाइफ, विपुल, अपार इन्डस्ट्रीज, चंबल फर्टीलायजर्स आणि नंदन डेनिम 12-10.4 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले.