|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीत निघाली नाटय़दिंडी

सावंतवाडीत निघाली नाटय़दिंडी 

सावंतवाडी : येथील श्री सद्गुरु संगीत विद्यालय आयोजित सावंतवाडी येथे 5 ते 8 जानेवारी कालावधीत होणाऱया संगीत नाटय़महोत्सवानिमित्त बुधवारी नाटय़दिंडी काढण्यात आली.

श्री विठ्ठल मंदिर येथून सायंकाळी सहा वाजता नाटय़दिंडीचा शुभारंभ झाला. माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शशिकांत नेवगी यांनी नाटय़दिंडीचा शुभारंभ केला. यावेळी संगीत नाटय़महोत्सव समितीचे अध्यक्ष शशिकांत सामंत, स्वागताध्यक्ष ऍड. दीपक नेवगी, सौ. मंजिरी धोपेश्वरकर, संचालक नीलेश मेस्त्राr आदींसह नागरिक, महिला, विद्यार्थी यात सहभागी झाले होते. उभाबाजार, गांधीचौकमार्गे बाजारपेठ अशी नाटय़दिंडी ढोलताशांच्या गजरात काढण्यात आली. संगीत नाटकात वेशभूषा केलेल्या बाल कलाकारांनी यात सहभाग घेतला होता. 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता बॅ. नाथ पै सभागृहात संगीत सौभद्र नाटय़ प्रयोगाचा शुभारंभ उद्योजक सोमकांत नाणोसकर व सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते होणार आहे.

 

Related posts: