|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » आता स्मार्टफोनबरोबर स्मार्ट सायकलही येणार बाजारात?

आता स्मार्टफोनबरोबर स्मार्ट सायकलही येणार बाजारात? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

स्मार्टफोन उत्पादन कंपनी लेईकोने दोन स्मार्ट रोड बाईक सादर केल्या असून या सायकली अँड्राईड मार्शमेलो वर अधारीत बाईक ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार आहे. एक रोड बाइक आहे, तर माउंटन बाईक आहे. दोन्ही सायकलींना टचस्क्रीन डिस्पले दिला गेला आहे.

माउंटन सायकलसाठी स्मार्ट नेव्हीगेशनसह कस्टम बाईक ऑपरेटिंग सिस्टीम दिली गेली आहे तसेच सालकलिंग करताना जोडीदार शोधायचा असेल तर त्यासाठी वेगळे ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. जवळच कुणी सायकल स्वार असेल तर त्याची माहिती यामुळे मिळू शकणार आहे. 6 हजार एमएएच बॅटरी दिली गेली आहे. दोन्ही मॉडेल्साठी -4 इंची टचस्क्रन, जीपीएस, एक्सलरोमीटर, कंपास, बॅरोमीटर, लाईट लेव्ह,व्हील स्पीट याच्यासाठी सेन्सर दिले गेले असून ही सर्व वॉटरप्रूफ आहेत. या सायकली 2017च्या दोन – तीन मीहन्यात उत्तर अमेरिकेत विक्रसाठी उपलब्ध होणार आहेत.

Related posts: