|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Automobiles » 1 किलो गॅसमध्ये 130 किमी धावणार ही CNG स्कूटर

1 किलो गॅसमध्ये 130 किमी धावणार ही CNG स्कूटर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

इकोप्रेंडली तंत्रज्ञानावर आधारित महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीवर धावणारी दुचाकी नुकतीच लाँच केली आहे. इटलीची कंपनी लोवाटोने भारतीय इकाई ईको फ्युदसह तयार करण्यात आलेल्या स्कूटरमध्ये सीएनजी किट देण्यात आले आहे. त्यामुळे या स्कूटरमध्ये एक किलो गॅस भरल्यास ही स्कूटर 130 किमी धावू शकणार आहे.

असे असतील या दुचाकीचे फिचर्स –

– इंजिन – या स्कूटरमध्ये 1.2 किलोचे 2 सिलिंडर देण्यात आले असून 60 पैसे प्रतिकिलोमीटरने ही स्कूटर धावण्याची शक्यता आहे.

– मायलेज – या नव्या स्कूटरमध्ये 1 किलो गॅस भरल्यास 120 ते 130 किमीचे मायलेज मिळू शकेल.

लोवाटोला आता 18 मॉडेल्समध्ये बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे.