|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » leadingnews » अर्थसंकल्प फेब्रुवारीतच होणार सादर : निवडणूक आयोग

अर्थसंकल्प फेब्रुवारीतच होणार सादर : निवडणूक आयोग 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आगामी निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर करण्यात येऊ नये, यासाठी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र, अर्थसंकल्प फेब्रुवारीतच सादर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

budget

देशात उत्तरप्रदेशसह अन्य पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प निवडणुका होण्यापूर्वी सादर केला जाऊ नये, यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धाव घेतली. आगामी निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर केला गेल्यास नागरिक सरकारच्या आश्वासनांना भुलून सरकारला मत देतील, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती.

96297election-commission-india

दरम्यान, निवडणुकीच्या काळात अर्थसंकल्प सादर केला जाऊ नये, या मागणीसाठी शिवसेनेचे सर्व खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या पदाधिकाऱयांच्या मेळाव्यात स्पष्ट केले होते. त्यानंतर आज अखेर निवडणूक आयोगाने अर्थसंकल्प नियोजित तारखेलाच होणार असल्याचे स्पष्ट केले.