|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वृद्धेला मिळाला संविताश्रमाचा आधार

वृद्धेला मिळाला संविताश्रमाचा आधार 

कणकवलीमालवण देऊळवाडा येथे गेल्या आठ वर्षांपासून निराधार स्थितीत राहत असलेल्या श्रीमती पार्वती शंकर मालवणकर (85) या महिलेला अखेर पणदूर येथील संविताश्रमाचा आसरा मिळाला आहे. यासाठी मालवण तालुका फोटोग्राफर असोसिएशनने प्रयत्न केले.

पार्वती मालवणकर या गेली आठ वर्षे मालवण-देऊळवाडा येथे मोडक्या झोपडीत राहत होत्या. त्यांचे जवळचे कोणीही नातेवाईक नव्हते. त्यातच त्या पायाने अपंगही आहेत. याबाबत मालवण येथील छायाचित्रकार राजेश पारधी यांनी जीवनआनंद संस्था संचलित संविताश्रमाचे संस्थापक सचिव संदीप परब यांना फोन केला. परब यांनी पार्वती यांना संविताश्रमात आणण्यास सांगितले.

पुढे मालवण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद बोडके, उपनिरीक्षक गायत्री पाटील यांच्या विनंतीपत्रावरून तसेच मालवण तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांच्या मदतीने पार्वती यांना संविताश्रमामध्ये आणण्यात आले. यावेळी राजेश पारधी, सुदेश मालवणकर, चेतन म्हापणकर, तोषक केळुसकर, समीर वर्दम आदी उपस्थित होते.

Related posts: