|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विकास करताना चुका झाल्या तर पत्रकारांनी जरुर दाखवाव्यात

विकास करताना चुका झाल्या तर पत्रकारांनी जरुर दाखवाव्यात 

प्रतिनिधी / वाई

नगरपालिकेच्या विकासात्मक बाबीत शहरातील पत्रकारांनी सातत्याने योगदान दिले आहे. शहराच्या विकास करताना काही चुका झाल्या तर त्या पत्रकारांनी जरुर दाखवाव्यात आणि त्या सुधारण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे उद्गार नगरपालिकेच्या नुतन नगराध्यक्षा नूतन नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी काढले.

पत्रकारदिनी शहरांतील पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे व उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सर्व पत्रकारांचे स्वागत करुन त्यांना सन्मानित केले.

यावेळी उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी नगरपालिकेला शहरांतील सर्व पत्रकारांचे सतत योगदान लाभले आहे. यापुढेही ते रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सर्वांना बरोबर घेऊन शहराचे कामकाज केले जाईल असे सांगितले.

पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव जगताप यांनी नगरपालिका      प्रथमच राबवित असलेल्या या उपक्रमाबद्दल आभार मानले. तसेच पालिकेच्या चांगल्या कामाला वाई शहरांतील सर्व पत्रकारांचे नेहमीच सहकार्य राहिल, असे सांगितले.

यावेळी उत्कर्ष नगरी सह.पतसंस्थेच्या नूतन चेअरमन श्रीमती अनुराधा कोल्हापूरे यांनाही सन्मानित करण्यात आले. त्यांनी सत्काराबद्दल धन्यवाद देवून पत्रकारांना नगरपालिकेने सन्मानित केलेबद्दल धन्यवाद दिले. यावेळी वाई शहर पत्रकार संघाचे सर्व सदस्य नगरसेवक कर्मचारी व निमंत्रित मोठय़ा संख्येने उपस्थित होते.