|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनपा अर्थसंकल्प 15 पूर्वी तयार होण्याची शक्मयता धूसर

मनपा अर्थसंकल्प 15 पूर्वी तयार होण्याची शक्मयता धूसर 

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करून प्रशासकीय मंजुरी घेणे आवश्यक आहे. मात्र डिसेंबर महिना संपला तरी अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करण्यासाठी पूरक माहिती महापालिकेतील विविध विभागानी दिली नाही. यामुळे आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन आवश्यक माहिती तातडीने देण्याची सूचना अधिकाऱयांना केली. अर्थसंकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी महापौरांनी लेखाधिकाऱयांशी चर्चा केली. अर्थसंकल्पात कोणत्या तरतूदी असाव्यात, याची माहिती घेण्यासाठी पुढील आठवडय़ात सर्वसामान्य नागरिकांची बैठक घेण्याचा आदेश दिला.

वास्तविक पाहता महापालिकेचे आर्थिक अंदाजपत्रक डिसेंबरमध्ये तयार करणे आवश्यक आहे. मात्र जानेवारी संपला तरी 2017-18 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार झाले नाही. अर्थसंकल्प तयार करून दि. 15 जानेवारीपर्यंत प्रशासकीय मंजुरी घेण्याची तरतूद महापालिकेच्या कायद्यात आहे. तसेच नगरविकास खात्याच्या मंजुरीसाठी फेब्रुवारीत पाठविणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेच्या विविध विभागप्रमुखांनी जमाखर्चाची तसेच अर्थसंकल्पाची माहिती लेखाविभागाला दिली नाही. यामुळे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अद्याप रखडले आहे.   अंदाजपत्रकाची माहिती तातडीने देण्यात यावी, अशी सूचना महापालिकेतील 16 विविध विभागप्रमुखांना  लेखाधिकाऱयांनी दिली होती. पण अद्याप पूरक माहिती दिली नसल्याने महापालिकेचे अंदाजपत्रक तयार झाले नाही. यामुळे महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन पूरक माहिती देण्याची सूचना केली. तसेच आतापर्यंत झालेल्या कामांचा समावेश यामध्ये करण्यात यावा. न झालेल्या कामांचा समावेश पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात दाखविता येईल, अशी सूचना करून लेखा विभागाला विविध सूचना केल्या.

Related posts: