|Monday, January 21, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

रविचे राश्यांतर आपले मनोबल वाढविणार आहे. आपल्यावरचे खोटे आरोप दूर होतील. वरि÷ांच्या सहमतीने आपण नवीन काम सुरू करू शकाल. कोर्टकचेरीची कामे गुरुवार पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नाटय़ चित्रपटक्षेत्रातील क्यक्तींचा नावलौकिक वाढेल. जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे शुक्रवारी संभवतात. प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात नवीन गुंतवणूक करू नका. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.


वृषभ

या आठवडय़ात आपल्या मनाप्रमाणे कामे होतील. प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी संभवतात. नोकरीत वरि÷ आपल्या कामावर खूष होणार आहेत. राजकीय क्षेत्रात आपल्या विचारांना महत्त्व मिळणार आहे. गुप्तहितशत्रुंच्या कारवाया उघडकीस आणता येतील. महत्त्वाची कामे या आठवडय़ात लवकर पूर्ण करा. अपेक्षित व्यक्तीची भेट घेता येईल. धंद्यात चांगला फायदा संभवतो. शेजारी कुरकुर करण्याची शक्मयता आहे. शनिवारी प्रकृतीची काळजी घ्या.


मिथुन

अडचणीतून मार्ग शोधावा लागेल. रविचा मकर राशीतील प्रवेश आपणास अपमानास्पद बोलणे सहन करण्याची शक्ती देईल. राजकारणात कठोर निर्णय घेऊ नका. विद्यार्थीवर्गाने खूप मेहनत घेतली तरच यश पदरी पडेल. आठवडय़ाची सुरुवात चांगली असणार आहे. नोकरीत महत्त्वाची कामे पूर्ण करण्यावर जास्त जोर द्या. कोर्टकचेरीच्या कामात वेळ फुकट जाऊ शकतो. वाहन जपून चालवा. तुमचा अंदाज चुकेल.


कर्क

आठवडय़ाच्या सुरुवातीला घरातील वाद वाढण्याची शक्मयता आहे. गैरसमज, मानसिक त्रास वाढेल. मात्र शांतपणे गुंता सोडवल्यास सर्व काही चांगले होऊ शकेल. गुरुवारपासून आपला प्रगतीरथ वेगाने धावणार आहे. उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळेल. राजकारणात व सामाजिक क्षेत्रात विचारपूर्वक पावले उचलली तर मोठे यश गाठू शकाल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. इतरांच्या मदतीची गरज भासेल. व्यवसायात थकबाकी वसूल करा.


सिंह

राजकीय सामाजिक क्षेत्रात नव्या उमेदीने कार्यास आरंभ करता येईल. रेंगाळत पडलेल्या योजना मार्गी लावता येतील. धंद्यात खर्च वाढेल. परंतु नवे काम मिळवता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात किरकोळ वाद संभवतो. नोकरीत वरि÷ांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागेल. कामाचा ताण जास्त असल्यामुळे उशीरापर्यंत कामे पूर्ण करावी लागतील. घर घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकेल. कर्जाचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करा.


कन्या

कुटुंबात ताणतणाव कमी होतील. रविचे राश्यांतर आपले वर्चस्व वाढविणार आहे. जीवनसाथीचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. शेतकरी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे. बँकेचे व्यवहार लवकर पूर्ण करा. शुक्रवारी व शनिवारी निष्कारण वाद सहकारी व आप्ते÷ यांच्यात  होईल. तुमचे शब्द धारदार वाटतील. नोकरीत वरि÷ मोठी जबाबदारी तुमच्यावर टाकतील. प्रवासात सावध रहा.


तुळ

साडेसातीचा शेवटचा टप्पा आता लवकर संपणार आहे. या आठवडय़ात तुम्ही जिद्द ठेवल्यास कोणतेही शिखर गाठू शकाल. धंद्यात मात्र गाफिल राहून चालणार नाही. विद्यार्थीवर्गाला खूप परिश्रम घेण्याची गरज आहे. घरातील जबाबदारी सांभाळण्याचा कंटाळा येईल. रविचे राश्यांतर राजकीय क्षेत्रात मतभेद निर्माण करू शकतील. मौजमजेत वेळ पटकन खर्च होईल. मागील थकबाकी वसुल करा.


वृश्चिक

प्रकृतीची  काळजी घेणे गरजेचे ठरेल. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. मोठमोठय़ांच्या आशीर्वादाने  नोकरी, व्यवसायात मोठी उडी  घेता येईल. चंद्र, बुध प्रतियुती व मकर राशीत सूर्याचे राश्यांतर होत आहे. राजकीय, सामाजिक, कार्यात बुधवार, गुरुवार अडचणी वाढतील. कुटुंबातील व्यक्तींना नाराज करू नका. अविवाहितांना योग्य स्थळे मिळतील.


धनु

शुक्र, नेपच्युन युती व मकर राशीतील सूर्याचे राश्यांतर तुमचा आत्मविश्वास व उत्साह वाढवणार आहे. स्वत:चे प्रश्न आधी सोडवा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. दगदग व धावपळ जास्त होईल. कोर्टकेसमध्ये स्वत: लक्ष द्या. संतती व जीवनसाथी यांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. संघर्ष संयमाने हाताळा.


मकर

शुक्र, नेपच्युन युती व मकर राशीत सूर्य प्रवेश होत आहे. कठोर परिश्रमानेच माणूस घडतो. त्यामुळे संघर्ष करावा लागेल. प्रति÷ा मानसन्मान यांचा विचार न करता तुमच्या क्षेत्रात तुम्ही मेहनत करा. बुधवार, गुरुवार नंतर तुमच्या कार्यात यश मिळण्यास सुरुवात होईल. राजकीय, सामाजिक कामात अडचणी येतील. विद्यार्थ्यांनी वाकडय़ा वाटेने जाऊ नये.


कुंभ

घरातील, बाहेरील कोणतीही महत्त्वाची कामे याच सप्ताहात पूर्ण करण्याचा प्रयत्न ठेवा. चंद्र -बुध प्रतियुती व मकर राशीत सूर्य प्रवेश होत आहे. कोर्टकेसमध्ये सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची महत्त्वाकांक्षा  महत्त्वाची ठरेल. अहंकार नको. प्रेमभावानेच कार्य करा. घर, वाहन खरेदी विक्रीत लाभ संभवतो. कुटुंबांच्या समस्या वेळच्यावेळी सोडवा.


मीन

संसारात शुभ समाचार मिळेल. परंतु जवळच्या क्यक्तीच्या प्रकृतीची योग्य ती काळजी घ्या. चंद्र, गुरु त्रिकोणयोग व मकरेत सूर्य प्रवेश होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. गुप्त कारवायांना ओळखा. मित्र, आप्ते÷, सहकारी वर्ग यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेऊ नका. भावनाविवश झाल्यास संताप वाढेल व प्रश्न निर्माण होतील.

Related posts: