|Saturday, October 20, 2018
You are here: Home » भविष्य » तूळ रास

तूळ रास 

ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची सातवी रास म्हणजे तूळ. मृदु स्वभाव, दयाळू वृत्ती, गायन -वादन, संगीतातील सर्व क्षेत्रावर अंमल. संसारात बरोबर संतुलन ठेवणारे. अत्यंत बुद्धिमान, हुषार व कुटुंबवत्सल तसेच खोटेपणा न खपणारी ही रास आहे. शुक्रवारी पावित्र्य पाळल्यास सर्व क्षेत्रात यशस्वी होऊ शकाल. पत्रिकेत जर या राशीचा स्वामी शुक्र उच्च अवस्थेत असेल व त्याला शनिची साथ असेल तर सर्व प्रकारचे सुखोपभोग मिळू शकतात. पण शुक्र बिघडला तर मात्र कितीही पैसा मिळाला तरी तो कधीच टिकणार नाही. मॉडर्न इंजिनियरिंग, आर्किटेक्चर व कॉमर्सवर या राशीचा विशेष प्रभाव दिसून येतो. सतत  काही ना काही करीत राहणारी माणसे या राशीवर जन्मतात. समतोल विचारसरणी, लक्ष्मी व कुबेराची कृपा. सर्व तऱहेचे व्यापारउदीम, पति-पत्नीतील प्रेम, दैवी कृपा यांचा अंमल असणारी ही रास आहे. चित्रा, स्वाती, विशाखा नक्षत्रांचे सर्व गुण या राशीत आहेत. यावषी ग्रहमान म्हणावे तसे अनुकूल नाही, त्यामुळे प्रत्येक बाबतीत जपूनच वागावे लागेल. गुरु बारावा असल्याने यावर्षी शत्रूपीडेचा त्रास होईल. धार्मिक कार्यात यश मिळेल. परदेश प्रवासाचे योग येतील. आर्थिक अडचण पडणार नाही. साडेसातीचा प्रभाव कमी होईल. यावर्षी कोणाचेही मन दुखवू नका अथवा शापू नका तसेच पिंपळ व केळी झाडाचे पूजन केल्यास गुरु अनूकूल राहील. कोणावरही अन्याय करू नका व अन्याय सहनही करू नका, असे तत्त्व बाळगणारी सातवी महत्त्वाची रास म्हणजे तूळ. मंगळ, राहू, गुरु व शुक्र यांचे अधिपत्य असणारी ही रास आहे. स्त्राr-पुरुषातील प्रेम, शारीरिक आकर्षण, वंशवृद्धी, सौंदर्य, देखणेपणा, टापटीप यावर या राशीचा अंमल आहे. ही रास नसती तर जगाची उत्पत्तीच झाली नसती. जगातील सर्व बऱया वाईट गोष्टींचे नियंत्रण ही रास करीत असते. कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात, हे शिकविणारी ही रास आहे. किचकट समस्या, न्याय-अन्याय, खरे-खोटे कळणे शक्मय नसते अशा ठिकाणी जर तुळेच्या व्यक्ती असतील तर बरोबर न्याय-निवाडा करतात. शनि न्याय देईल तर ही रास त्याची योग्य अंमलबजावणी करील म्हणून शनि या राशीत अतिशय आनंदी असतो. काही लोक विशेषतः भगिनीवर्ग डाव्या हातात अंगठय़ा घालतात. पण त्याचे दुष्परिणाम काय होतात हे या राशीवरुन बरोबर समजते. दैत्यगुरु शुक्र यांच्या मालकीची ही रास आहे. त्यामुळे दैत्यांचे बरेवाईट सर्व गुणधर्म या राशीत दिसून येतात. पैसा कमवायला कोणत्याही थराला ही माणसे जाऊ शकतात. त्यात काही मार्ग इतरांपेक्षा भिन्न असू शकतात. प्रसुतीगृहे, स्त्रिया संबंधित सर्व व्यवसाय, पांढऱया रंगाच्या वस्तू, वस्त्राsद्योग, पत्रिकेतील नाडीदोष, वैवाहिक जीवन, परस्परात आकर्षण राहील की घटस्फोट होईल, न्यायालयात न्याय मिळेल की अन्याय, सर्व प्रकारची धनदौलत, दीपावली, लक्ष्मीपूजन या साऱया बाबी याच राशीखाली येतात. अमावास्या शुभ मानली जात नाही. पण लक्ष्मीपूजेला मात्र तिला शुभत्व प्राप्त करून देण्याचे काम ही तूळ रासच करू शकते. या राशीत काही दोष दुर्गुणही, आहेत, त्यांचा यांनी त्याग केल्यास लक्ष्मीची यांच्यावर कायम कृपा राहील व आयुष्यात त्याना कधीही कमी पडणार नाही. एखाद्याची वंशवेल वाढेल की नाही हे या राशीवरून सांगता येते. राहुचा कपटीपणा व राजयोग परदेश प्रवास गुरुची सात्विकता व सोशिकता, अन्याय झाल्यास त्याची शिक्षा देण्याची वृत्ती तसेच चांगले काम केल्यास त्याची शाबासकी देणाऱया याच व्यक्ती असतात.

दोन महत्त्वाची चंद्रग्रहणे, हर्षलचे सप्तमात होणारे आगमन संपत आलेली साडेसाती. गुरुचा तुमचा राशीत होणारा प्रवेश या अत्यंत महत्त्वाच्या व संस्मरणीय बाबी म्हणता येतील. राशिचे गुणधर्म बघतानाच महत्त्वाच्या गोचर ग्रहणांच्या भ्रमणाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. यावषी 10 फेब्रुवारीचे चंद्रग्रहण दशमात होत असून ते तुम्हाला सर्व बाबतीत शुभ नाही. काही कौटुंबिक समस्या डोके वर काढण्याची शक्मयता आहे. एप्रिलमध्ये तुमच्या राशीच्या सप्तमात येणारा हर्षल आगामी सात वर्षापर्यंत कमी जास्त प्रमाणात त्याचे वास्तव्य तेथे राहील. किरकोळ कारण अथवा संशयी वृत्तीमुळे कौटुंबिक सुखाचा बोजवारा उडू देवू नका. जोडीदाराच्या स्वभावात लहरीपणा निर्माण होईल. ध्यानीमनी नसताना विचित्र घटना घडून अचानक लग्न होणे आंतरजातीय प्रेमविवाह, भागीदारीत घोटाळे अचानक दूरवरचे प्रवास योग, लग्न करणार नाही, असे म्हणणारे लग्नाच्या बेडीत अडकणे कोर्टप्रकरणांचे निकाल उलट सुलट लागणे यासह अनेक आश्चर्यकारक घटना या हर्षलमुळे घडू शकतात. हर्षलच्या घटना अचानक घडत असल्याने त्याचे पूर्वनियोजन करता येत नाही. 9 जानेवारी ते 20 जूनपर्यंतचा काळ तुम्हाला सर्व बाबतीत शुभ ठरणारा आहे. या काळापुरती साडेसाती शिथिल झालेली असेल. घडलेली सर्व कामेही होऊ लागतील. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये साडेसाती पूर्ण संपेल. 12 सप्टेंबरनंतर तुमच्या राशीत येणारा गुरु तुमच्या अनेक कामांना गती मिळवून देईल. आगामी कालखंड सुखात जाणार असल्याचे संकेत पण देईल. या वर्षाची संक्रांत वर्षभर तुम्हाला काही ना काही देत राहील. गाडी, वाहन, बंगला, लग्न, संतती लाभ, मानसन्मान या सर्वांचा यात समावेश राहील.


मासवार फलप्राप्ती 

जानेवारी – रवि-बुधाचे पराक्रमातील भ्रमण अनेक बाबतीत साहाय्यक ठरेल.  प्रति÷ित व मोठी माणसं ऐनवेळी दगा देतील पण साध्या-सुध्या व्यक्ती ऐनवेळी मदतीला धावून येतील. ही संक्रांत वर्षभर तुम्हाला सर्व तऱहेचे सुख देईल. महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शुक्र, केतू, नेपच्यूनचा योग अध्यात्मिक बाबतीत चांगला आहे. पण इतर नको ती प्रकरणेही निर्माण करील. 26 रोजी शनिची साडेसाती काही प्रमाणात संपणार आहे. त्यामुळे अडलेली कामे वायूवेगाने होऊ लागतील.


 

फेबुवारी  – मंगळ -शुक्र- हर्षलची युती चमत्कारी घटना घडवील. प्रेमप्रकरणे निर्माण होतील. राजकारणात यशस्वी व्हाल, नोकरी व्यवसायात काही नवे डावपेच लढवावे लागतील, लग्न ठरलेले असेल तर घोटाळे उद्भवतील, आर्थिक बाबतीत हा महिना चांगला जाईल. कोर्ट-कचेऱया व तत्सम प्रकरणे असतील तर सावध रहावे लागेल. या महिन्यात गुरुपुष्यामृतावर सोने खरेदी करून ते जवळ ठेवा, भाग्य उजळेल.


 

मार्च  – या महिन्यात मंगळ प्रभावी आहे. कोणत्याही संकटातून मार्ग निघेल. इंजिनियरींग, गणित, कॉमर्स, मिलिटरी, पोलीस या क्षेत्राशी संबंध असेल तर मोठे यश मिळवाल. बुध अनुकूल नाही. विस्मरण होणे, कागदोपत्री घोटाळे व फसव्या जाहीरातीमुळे मनस्ताप होईल. होळी पौर्णिमा लाभात होत आहे. काही तरी लाभ निश्चित होतील पण मित्रमंडळीच्या नादी लागून व्यसने मात्र करू नका.


 

एप्रिल  – मंगळ अष्टमात व रवि सप्तमात येत आहे. लग्न झाले असेल तर भाग्योदयास सुरुवात होईल. जमीन-जुमल्याचे व्यवहार यशस्वी होतील. सरकार दरबारी अडलेली मोठी कामे पूर्ण होतील. सरकारी नोकरीत असाल तर वेगावर नियंत्रण ठेवा अन्यथा बॉसची खप्पामर्जी होईल. उद्योग व्यवसायात तुमची कार्यक्षमता वाखाणली जाईल. त्यामुळे कामाच्या नवीन ऑर्डर्स मिळू  लागतील.


 

मे  – मुलाच्या कर्तबगारीने शुक्राचे वास्तव्य अचानक व कमी श्रमात धनलाभ घडवून देईल. आठव्या स्थानातील रविमुळे नोकरीसाठी प्रयत्न केलेले असतील तर ते कुणाच्या तरी वशिल्याने यशस्वी होतील. घराण्यातील काही गुप्त गोष्टी बाहेर जाण्याची शक्यता असल्याने काळजी घ्या. अती उष्णतेने डोळय़ांचे विकार उद्भवतील.


 

जून  – शिक्षणात उत्तम यश मिळेल. काही शुभ घटनांमुळे देवाधर्माकडे ओढा वाढेल. वाहन सौख्य उत्तम राहील. तीर्थयात्रेचे योग, परदेशी जाण्याची संधी येईल. दैनंदिन जीवन व्यवस्थित चालेल. सामाजिक क्षेत्रात प्रवेश कराल. मशिनरीशी संबंधित क्षेत्र असेल तर उद्योगपती व्हाल. मंगळ भाग्यात असल्याने आत्मविश्वास वाढेल. हातून चांगली व कुटुंबाला उत्कर्षदायक कृत्ये घडतील.


 

जुलै  – 11 तारखेला दशमात येणारा मंगळ सर्व बाबतीत यश देणारा आहे. कुटुंबात श्रीमंती येईल. शासकीय मानसन्मान मिळेल. कोणताही नवीन उद्योग व्यवसाय सुरु करा, जोरात चालेल. सामाजिकदृष्टय़ा बदनाम लोकांबरोबर राहू नका अन्यथा कोठेतरी अडकाल. दशमस्थ बुधामुळे सतत आर्थिक लाभ होत राहतील. एखाद्या संस्थेचे, जिल्हय़ाचे अथवा राज्याचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळेल. ठेकेदारी व्यवसाय असेल तर मोठे यश मिळवाल.


 

ऑगस्ट  – दशमातील रविचे भ्रमण सर्वकार्यात यश देणारे आहे. एखादी जबाबदारी पडल्यास ती मुळीच नाकारू नका. 21 रोजी दशमात येणारा शुक्र सुखसमाधान आणि ऐषआराम देऊन जाईल. अपघातातून वाचाल. कोणतेही शुभकाम केल्यास त्याचा उत्तम अनुभव येईल. मित्र मंडळीच्या सहकार्याने नवीन उद्योग व्यवसाय सुरू कराल व त्यात यश मिळत जाईल.


 

सप्टेंबर  – रवि अनुकूल आहे तोपर्यंत कोणतेही सरकारी काम करून घ्या. थाटामाटात व आनंदी रहा. त्याचा परिणाम तुमच्या व्यवसायावर चांगला होईल. राजकारणात असाल तर मुत्सद्देगिरी वापरा, पैसा व पद दोन्हीही मिळेल. बुधाचे भ्रमण अर्थिक अडचणी दूर करील. मुलाबाळांच्या बाबतीत अनुकूल वातावरण राहील. शुक्राचे भ्रमण नवे जिवलग मित्र जोडण्यास साहाय्यक ठरेल. एखादी व्यक्ति तुमच्या उत्कर्षास कारणीभूत ठरेल.


 

ऑक्टेंबर  – बाराव्या रविचे भ्रमण खर्च वाढवील. मंगळही तेथेच येत असल्याने वादावादी, मतभेद, संघर्ष यापासून दूर रहा. वाहन शिकण्यास अनुकूल काळ. तुमच्या राशीत आलेला गुरु गजकेशरी योग करीत आहे त्यामुळे विवाहाच्यादृष्टीने अनुकूल योग. सर्व अडलेली कामे मार्गस्थ होऊ लागतील. दिवाळी दरम्यान कुटुंबात शुभ घटना व नव्या व्यक्तिचे आगमन होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. 


 

नोव्हेंबर- अनेक ग्रह शुभयोगात आहेत. मनातील सर्व आशा आकांक्षा पूर्ण करू शकाल. नावलौकीक, मानमरातब, भाग्योदय, प्रवास या बाबतीत सुदैवी राहाल. नोकरी व्यवसायातील सर्व ताणतणाव कमी होतील. मुलाबाळांचा भाग्योदय सुरू होईल. तुमच्याकडे बुद्धीकौशल्य, चातुर्य, अविरत कष्टाची तयारी असेल तर हा काळ तुम्हाला न भूतो न भविष्यती असे चांगले फळ देईल. धनलाभाच्या अनेक संधी येतील. काही योजना प्रत्यक्षात साकार करू शकाल. नातेवाईक व मित्रांचे सर्व कामात उत्तम सहकार्य लाभेल. पण हे असले तरी शिक्षण व्यवस्थित होईल. याकडे लक्ष द्या, एखादी चूक पुढे अंगलटही येऊ शकते. अमावास्या अनेक बाबतीत लाभदायक.


 

डिसेंबर-रवि, शनिचा अशुभ योग सुरू आहे. शेजारी व  सगेसोयरे, नोकरी व्यवसायात जरा जपून रहा. कुणाच्याही भानगडीत अडकणार नाही, याची काळजी घ्या. नवीन जबाबदाऱया स्वीकारू नका. अथवा कुणाची भलावणही करू नका. बुध सर्व कामात यश व धनलाभ घडवील. शुक्रामुळे वाहन घेण्याची संधी येईल. जमिनीचे व्यवहार चालू असतील तर ते यशस्वी होतील. शिक्षणात अडचणी येतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे, तरुण तरुणांनी अवांतर विषयाकडे लक्ष न देता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे योग्य. या महिन्यात अनेक प्रलोभने दिसतील. नवे धाडस करण्याचा विचारही कराल. या महिन्यात घडणाऱया घटनांचे दूरगामी परिणाम जाणवतील.

Related posts: