|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » भविष्य » वृश्चिक रास : वार्षिक राशीभविष्य 2018

वृश्चिक रास : वार्षिक राशीभविष्य 2018 

आधी प्रपंच व नंतर परमार्थ, धाडस व कष्ट यांचा योग्य समन्वय, आध्यात्मिक प्रगती तसेच वाहत्या पाण्यावर अंमल असणारी ही रास आहे. तामसी वृत्ती, खडकाळ जमीन, विषारी प्राण्यांची स्थाने यावर या राशींचा अंमल आहे. सुवर्णावर व सराफी व्यवसायावर या राशीचे अतिप्रेम असते. दाहकपणा, कडक वृत्ती, लष्करी बाणा, हरण व वाघ दोन्हीवर प्रभुत्व. झोपण्याची खाट, तांबे, पादत्राणे तसेच अत्यंत पवित्र वनस्पती प्रवाळ यावरही याची मालकी आहे. नखरेलपणा व चित्रविचित्र फॅशन करावी ती याच लोकांनी. ज्ये÷ पदही यांच्याकडेच आहे. जोपर्यंत या व्यक्ती शांत असतात तोपर्यंत सोन्यासारखी झळाळी देणारे काम व चिडल्यावर हंटर मारण्याचे काम करतात. यावषी शनि/गुरुचे राश्यांतर हर्षलचा दीर्घकालीन प्रवेश. राहुकेतूचे बदल, दोन चंद्रग्रहणे यांचा विशेष प्रभाव या राशीवर दिसून येईल. 10 फेब्रुवारीचे चंद्रग्रहण भाग्यात येत आहे. प्रवासात काळजी घ्या. यात्रा, जत्रा, बळी या प्रकारांना फाटा द्या 7 ऑगस्टचे चंद्रग्रहण तुम्हाला सर्वदृष्टीने समृद्धीकारक राहील. परंतु नातेवाईकांशी गैरसमज निर्माण होतील. 7 एप्रिलला बदलणारा हर्षल मानसिक चंचलता वाढवेल. अनाकलनीय आजार होतील. मोबाईलमुळे तसेच मोबाईल वा विद्युत उपकरणामुळे गंभीर अपघात संभवतात. किंमती वस्तूंची काळजी घ्या. शत्रुभावना निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. कोर्ट मॅटरमध्ये सावध रहा. नोकर चाकरावर अति विसंबून राहू नका परंतु त्यांचे मन दुखवू नका. हर्षलचा परिणाम दीर्घकालीन असल्याने आगामी 7 वर्षे हे परिणाम जाणवतील. हर्षलचे परिणाम अचानक होत असल्याने सावध रहाणे हाच उपाय सप्टेंबरमध्ये राहू, केतूचे राश्यांत्तर आगामी दीड वर्षपर्यंत संमिश्र फलदायी आहे. शनिची साडेसाती अंतिम टप्प्यात आहे. विवाहाच्यादृष्टीने उत्तम योग. स्वतःचे घरदार, वाहन यादृष्टीने अनुकूल काळ.


वृश्चिक

धाडस, धडाडी, राजकारण, मुत्सद्दिपणा, कष्ट करण्याची तयारी, नवनव्या फॅशन्स यांचा अंमल असणारी ही रास आहे. चिकाटीचा अभाव, अतिरेक, अतिराग, अनुराधा नक्षत्राचा देखणेपणा, मृदुता, सर्वसमन्वयात्मक दृष्टिकोन, समजूतदारपणा, आकर्षकपणा, खुनशी वृत्ती, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी लागणारा स्टार्टर. विशाखा नक्षत्राचे प्रचंड धाडस असणारी ही रास आहे. कार्यक्षमतेचा उत्कृष्ट नमुना असणारी, काम कसेही करून घेणारी  ही रास आहे. अत्यंत अवघड काम या राशीच्या व्यक्ती करू शकतात. धडपडय़ा स्वभाव. रागाचा उदेक, दाहकपणा, एखाद्याला लावून घेतल्यास जीवाला जीव देणारी पण चिडल्यास कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सर्व काही नष्ट करणारी रास म्हणजे वृश्चिक रास. पण आग पाण्याला घाबरतेच या न्यायाने वृश्चिकेच्या व्यक्तींचे अंतरंग समजून घेतल्यास कठोर व्यक्तीकडून अवघड कामे करून घेता येतात. या माणसाना कसे हाताळावे याचे ज्ञान नसल्यानेच सर्वसामान्य लोकांना वृश्चिकेच्या व्यक्ती सहजसाध्य वश होत नाहीत मूळव्याध, उष्णताविकार, रक्तदोष, आर्तव, तांबे धातू, शारीरिक आकर्षण या साऱयावर वृश्चिक राशीचा प्रखर अंमल असतो. कोणत्याही गोष्टीत चूक झाल्यास ती मान्य करणार नाहीत. फॅशन डिझायनिंग, मोठ-मोठय़ा मोटार, मशिनरी, आटोमोबाईल लाईन, खलनायकाची वृत्ती, राजकारणी मुत्सद्धीपणा, अपार कष्ट करण्याचीच तयारी याच राशीत दिसून येते. चिकाटीचा अभाव, प्रत्येक गोष्टीत अतिरेक, अतिक्रोध या बाबीचा त्याग केल्यास ही माणसे जीवनात फार मोठे यश मिळवू शकतील. हौसेला मोल नसते हे शिकावे याच राशीच्या लोकांकडून. अनुराधा नक्षत्राचा देखणेपणा, मृदुता, समजुतदारपणा,आकर्षकपणा सर्व तऱहेची रसायने, जेष्ठा नक्षत्राचा क्रोध, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी लागणारे धाडस, एक घाव दोन तुकडे करण्याची वृत्ती, नोकरीतील अधिकार, दंगली, चक्कर येणे, संततीसौख्यात येणारे अडथळे या साऱया बाबींचा खोलपणा पाहिल्यास  वृश्चिक राशीचे महत्त्व समजून येईल. ज्याला वृश्चिकेची माणसे वश त्याला जगात कशाचीही भीती नाही. वृश्चिक रास ज्या घरात असते तेथे हमखास राजकारण असतेच. ज्या संस्थेत वृश्चिक राशींच्या लोकांचा भरणा अधिक असतो तेथे सर्वाधिक राजकारण चालू असलेले दिसून येते.

यावषी गुरु अकरावा असल्याने तो सर्व बाबतीत शुभ आहे. सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. संपूर्ण वर्ष विवाहासाठी अनुकूल आहे. संतती होण्याचे योग, प्रवास, भागीदारी, कोर्टप्रकरणे याबाबतीतही शुभ फळे मिळतील. शनि 9 जानेवारीपर्यंत तुमच्या राशीत व त्यानंतर धनस्थानी येत आहे. आर्थिक बाबतीत चांगल्या घटना घडतील पण तरीही खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. जुगार, लॉटरी, सट्टा, शेअर -बाजार यात म्हणावे तसे चांगले यश मिळणार नाही. सावकारी अथवा व्याजाने पैसे देण्याचा व्यवहार असेल तर हे वर्ष नुकसानकारक ठरेल. तुमचे वय 24, 36, 47 असेल तर यावषी तुम्हाला बऱयापैकी पैसा मिळू शकेल.


जानेवारी- संक्रांती दरम्यानचा काळ कार्यकर्तृत्त्वाला पोषक वातावरण निर्माण करील. त्यातून जीवनाला चांगले वळण मिळू शकेल. षडाष्टकात होणारी पोर्णिमा काहीतरी शुभवार्ता घेऊन येईल. विशाखा नक्षत्र असेल तर वर्षभर सतत काही ना काही सुखोपभोग मिळत रहातील. जेष्ठा व अनुराधा नक्षत्राला संक्रांत शुभ नाही, काही व्यथा वारंवार सतावतील.


फेब्रुवाराr – रवि, मंगळ, बुधाचे उत्तम सहकार्य आहे. त्यामुळे अवघड वाटणाऱया कामामध्ये कौतुकास्पद यश मिळवू शकाल. महाशिवरात्री नोकरी व्यवसायात काही तरी महत्त्वाचे पण चांगले बदल घडवील. बिघडलेले नाते संबंध सुधारतील. 27 ची अमावास्या व वाहन अपघाताच्या बाबतीत जरा चिंता निर्माण करणारी आहे.


मार्च – राजयोगावर असलेली 12 तारखेची होळी, नोकरी व्यवसाय, आर्थिक स्थिती व वास्तुसंदर्भातील अडचणी दूर करील. जे काम हाती घ्याल ते यशस्वी करून दाखवाल. वडिलधारीमंडळी जरा विक्षिप्त वागण्याची शक्मयता आहे. त्यांच्या बाबतीत काही निर्णय जपूनच घ्यावे लागतील त्यांचे मन सांभाळावे लागेल.


एप्रिल – हा महिना गृहारंभ, घरदार, मुलाबाळांचा भाग्योदय या दृष्टीने शुभ. 17 ची पौर्णिमा अनेक अवघड कामातील बारीक-सारीक अडथळे दूर करील. विवाह, परदेश प्रवास, नोकरीतील बदल या संदर्भातील कोणतेही काम हमखास यशस्वी होईल.


मे – नवीन काहीतरी चांगली घटना घेऊन सुरुवात होत आहे. संतती नसणाऱयांना आशादायक वातावरण आहे. एकाचवेळी मोठा धनलाभ घडवणारी तीन मोठी कामे मिळण्याची शक्मयता. जे काम कराल त्यात तिप्पट लाभ होईल. सरकारी कामे कितीही अवघड असली तरी पूर्ण होतील. नव्या मित्र मंडळीची ओळख व त्यांच्यामुळे अनेक समस्या सुटतील. साडेसाती असूनही आर्थिक अडचण जाणवणारी नाही. नोकरी व्यवसायात उत्साही वातावरण राहील.


जून – बुध, मंगळ, केतू यांचा योग जरा त्रासदायक आहे. विचार न करता केलेले काम अथवा न वाचता केलेली सही अंगलट येण्याची शक्मयता. जर कोणाला जामीन राहिला असाल तर सावध रहाणे योग्य ठरेल. वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीत त्रासदायक योग. अनोळखी माणसाबरोबर दूरवरचे प्रवास करू नका अथवा वाहन असेल तर चुकूनही कुणाला लिफ्ट देऊ नका. पैशाचे आमिष दाखवून काही नवीन भाडेकरू येतील पण जरा सावध रहाणे आवश्यक.


जुलै – कामात अडथळे निर्माण झाल्याने मानसिक स्थिती अस्वस्थ राहील. युतीमुळे एखाद्याला मदत करायला जाल पण कुठेतरी अडकून बसाल. त्यासाठी सांभाळावे. अमावास्या आर्थिक भाग्योदय घडविण्याची शक्मयता. किमती वस्तू कमी किमतीत खरेदीचे योग. लग्नासाठी नवनवीन ऑफर येऊ लागतील तसेच नवीन कंत्राटे मिळण्याची शक्मयता. काही कामे गुप्तपणे करावी लागतील.


ऑगस्ट – अनेक शुभ योग या महिन्यात झालेले आहेत. त्यामुळे विवाह, प्रवास, धार्मिक काम, देवघेव कर्जफेड, नवीन गुंतवणूक, वैवाहिक सौख्य यासह सर्व कामात उत्तम यश मिळवाल. चमत्कारीक घटनांमुळे नातेवाईकांच्या नजरा तुमच्याकडे वळतील. अमावास्या पित्त व पोटाचे विकार निर्माण करण्याची शक्मयता. मानसिक समाधान देणारा महिना. आर्थिक समस्येमुळं दूर गेलेली माणसे परत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील. जुने वाहन खरेदी कराल व ते लाभेल.


सप्टेंबर – ग्रहमानाची विशेष कृपा आहे. नोकरी, उद्योग, व्यवसाय, संततीलाभ, कौटुंबीक सुधारणा, राहत्या वास्तूत बदल, अपेक्षित ठिकाणी स्थलांतर या बाबतीत हा महिना चांगला ठरेल पण व्यसन व इतर अनिष्ट बाबी असतील तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. कुलदेवतेच्या बाबतीत सेवा, पितरांच्या बाबतीत काही चुकले असेल तर ते निस्तरण्याचा प्रयत्न करा. त्याचा चांगला परिणाम जाणवेल. काही कारणाने झालेले गैरसमज निवळतील.


ऑक्टोंबर- माणसाला हवे असलेले सर्वच काही मिळते असे नाही. पण कल्पना नसताना जर गडगंज मिळाले तर तो चमत्कारच. अशा काही घटना या महिन्यात घडतील. नवरात्रीच्या पूजेने सर्व संकटे नष्ट होतील. मनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल. लग्न व इतर मंगल कार्याच्या वाटाघाटी सफल होतील. घरात नव्या व्यक्तीचे आगमन होईल. स्वतःची कमाई व आपल्या कौटुंबिक बाबीची शक्मयतो कुठेही चर्चा करु नका. जुनी गाडी देऊन नवी घेण्याचा प्रयत्न कराल पण ती तुमची घोडचूक ठरण्याची शक्मयता आहे. गुरुचे 12 व्या स्थानी झालेले आगमन जरा त्रासदायक आहे. साडेसातीही सुरु आहे. कोणतेही काम जपून करावे ते योग्य ठरेल.


नोव्हेंबर – या महिन्यात रवी, शुक्राचे भ्रमण 12 व्या स्थानी आहे. चैनबाजीवर नियंत्रण ठेवा. शत्रूंच्या कारवायांपासून सावध रहावे लागेल. सरकारी कामकाजात अडचणी येतील. काहीवेळा धर्माविरुद्ध आचरण करण्याकडे कल राहील. कुटुंबातीलच काही व्यक्तीकडून आर्थिक नुकसान भोंदुगिरीमागे लागू नका. 18 ची अमावस्या मानसिक स्थिती दोलायमान ठेवेल. 26 ला तुमच्या राशीत येणारा शुक्र सर्व बाबतीत शुभ. पण अनैतिकतेकडे मन वळण्याची शक्मयता. 29 तारखेस मंगळ अनिष्ट स्थान येईल. खर्च वाढतील. कर्ज काढावे लागेल. नवीन व्यवसायात गुंतवणूक कराल.


डिसेंबर – सप्तमातील पौर्णिमा वैवाहिक जीवनात आनंद निर्माण करेल. 10 डिसें.ला राशीत येणारा बुध व्यवहारात साफल्य देईल. 17 व 18 ची अमावास्या किंचित त्रासदायक ठरेल. 20 डिसें.ला धनस्थानी येणारा शुक्र. आर्थिक बाबतीत उत्तम. किंमती वस्तूंच्या व्यापारात यश. आर्थिकस्थिती उत्तम. काही संकल्प प्रत्यक्षात उतरतील. ताणतणावातून मुक्त व्हाल. रवी, शनि योगामुळे काहीतरी गडबड गोंधळ होऊन नोकरी सोडण्याचा प्रसंग येईल. शक्मयतो कोणाच्या आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करू नका. काही किरकोळ बाबी वगळता हे वर्ष तुम्हाला उत्तम जाईल. कायदेकानूनी प्रकरणात अडकू नका.

Related posts: