|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » leadingnews » नाशकात तब्बल 800 दुकाने जमीनदोस्त

नाशकात तब्बल 800 दुकाने जमीनदोस्त 

ऑनलाईन टीम / नाशिक :

नाशिक महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज शहरातील बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला. या कारवाईमध्ये तब्बल 800 हून अधिक दुकाने, कारखाने जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

atikraman

गेल्या 17 वर्षांपासून शहरातील 100 एकरावरील बेकायदा दुकाने आणि कारखान्यांना खाली करण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले होते. यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी मुदत वाढ दिली गेली. मात्र, या आleदेशानंतरही या परिसरातील बेकायदा दुकाने, कारखाने हटवण्यात आली नाहीत. त्यामुळे आज अखेर महापालिकेने या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली.

ati

या कारवाईसाठी प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या कारवाईसाठी 100 जेसीबी, पोकलेनची मदत घेण्यात आली. यासाठी सुमारे एक हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. तसेच या कारवाईचे ड्रोनच्या माध्यमातून चित्रिकरणही करण्यात आले.