|Wednesday, January 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » दीपाली-सुखदाची जुगलबंदी

दीपाली-सुखदाची जुगलबंदी 

अभिनयासोबतच आपल्या बहारदार नफत्याविष्कारांनी रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री दीपाली सय्यद प्रथमच एका हिंदी-मराठी फ्युजन असलेल्या जुगलबंदी गीतावर थिरकताना दिसणार आहे. आर. पी. जी प्रॉडक्शन प्रस्तुत आणि राजश्री गायकवाड निर्मित ‘हिरो’ या आगामी मराठी सिनेमात आपल्याला हे गाणे पहायला मिळणार आहे. दीपाली सय्यदसोबत शास्त्राrय नफत्यात तरबेज अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा भन्नाट नफत्याविष्कार पहायला मिळणार आहे. एन. एन. सिद्दिकी  दिग्दर्शित ‘हिरो’ चित्रपटातील हे गीत नुकतेच चित्रीत करण्यात आले आहे.

 या गीताला ख्यातनाम ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि साधना सरगम यांनी मखमली स्वरसाज दिला आहे. गीतकार अस्लम सयानी आणि कौस्तुभ पंत यांनी लिहिलेल्या या हिंदी-मराठी फ्युजन गीताला संगीताची साथ संगीतकार राजा अली यांनी दिली तर नफत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे. दीपाली सय्यद यांना आजवर असंख्य गीतांवर नफत्य सादर करताना पाहिले आहे. परंतु, हिरो चित्रपटातील या गीताच्या निमित्ताने प्रथमच दीपाली आणि सुखदा यांची अफलातून अदाकारी एकत्रित पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. अनिस मोराब सहनिर्मित ‘हिरो’ चित्रपटात रमेश देव, विजय पाटकर, उदय टिकेकर, सुखदा खांडकेकर, भूषण पाटील, वैष्णवी कर्मारकर यांच्या भूमिका आहेत.

Related posts: