|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सूमधुर सूरांच्या वर्षावात संगीतप्रेमी चिंब

सूमधुर सूरांच्या वर्षावात संगीतप्रेमी चिंब 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

    ‘दिवे लागले रे, दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले,’ या कविवर्य शंकर रामाणी यांनी शब्दबद्ध केलेल्या व पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी सूमधुर सूरांत गायिलेल्या पंक्तींनी रसिकपेमी चिंब झाल्याचा रविवारी मंगलदीप या मैफिलीत प्रत्यय आला. यावेळी त्यांनी घेतलेले आलाप व हरकतींना रसिकांनी प्रचंड टाळय़ांच्या वर्षावात दाद दिली.  

   येथील मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे पेटाळा परिसरातील राम गणेश गडकरी सभागृतहात ‘मंगलदीप’ ही मैफिल सायंकाळी रंगली. यावेळी त्यांनी रसिकांच्या मागणीनुसार अनेक भावगीते, नाटय़गीते सादर केली. यावेळी जोगळेकर यांच्या हस्ते ‘मदनमोहन लोहिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त संगीत समारोहातील राज्यस्तरीय भावगीत, नाटय़गीत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख महादेव तांबडे, मंचचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांची प्रमुख उपस्थिती होती. दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

   यावेळी ‘मंगलचरणा गजानना’ या गीताच्या भक्तीरसात संगीत मैफिलीला सुरूवात झाली. ‘मधूमिलनात या.. विलोभने’ हे नाटय़गीत त्यांनी सादर केले. यानंतर इंदिरा संत यांची ‘आज येणार अंगणी सोनचाफ्यांची पावले’ हे गीत सादर केले. आयुष्यात माणसाने नेहमी सकारात्मक रहावे, यासाठी रसिकांसाठी त्यांनी ‘निशंक हो, निर्भय हो,’ हा तारक मंत्र सादर केला. यानंतर शुभदा सुभेदार यांचे ‘मेघा रे’ या अल्बममधील ‘शारदास्तवन’ सादर केले. यावेळी त्यांना तितकीच सूरेल साथसंगत – सोनाली बोरकर, पूजा देसाई-चाफळकर यांनी, तबलावादन – राजप्रसाद धर्माधिकारी यांनी, हार्मोनियम वादन -मंदार पारखी यांनी तर सिंथेसाइझर वादन – जयंत पवार यांनी केले.

   यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पद्माकर सप्रे, को-ऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष नितीन वाडीकर, संस्थेचे सहसचिव व प्राचार्य पी. एस. हेरवाडे, प्राचार्य एस. एस. चव्हाण, पी. बी. मुळे, डॉ. शितल धर्माधिकारी, प्रा. गोविंद पैठणे, सतीश माळी, मोहन भांडवले, शाळांचे कला शिक्षक उपस्थित होते. यावेळी प्रा. सतीश कुलकर्णी यांनी स्वागत केले. बी. ए. मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related posts: