|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पेट्रोल पंपावर पेडीट, डेबिट कार्ड चालणार नाही

पेट्रोल पंपावर पेडीट, डेबिट कार्ड चालणार नाही 

रत्नागिरी / प्रतिनिधी
राज्यातील सर्व पेट्रोल, डिझेल पंपांवर 8 जानेवारी 2017 पासून सर्व प्रकारच्या इंधन विक्रीसाठी क्रेडीट अथवा डेबिट कार्ड स्वीकारले जाणार नाही, अशी घोषणा फामफेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी केल़ी
त्यांनी या संदर्भात काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, 8 जानेवारी 2017 च्या मध्यरात्रीपासून पुढील तोडगा निघेपर्यंत पेट्रोल, डिझेल विक्रीची किंमत पेडीट कार्डद्वारे स्वीकारली जाणार नाह़ी ग्राहकाला 0.75 टक्के एवढा परतावा डिजीटल व्यवहारांना दिला जात आह़े त्याचा हिशोब पेट्रोल पंप चालकाला मिळत नाह़ी प़ी ओ़ एस़ टर्मिनलमधून इंधन विक्रीवर 0.25 ते 1 टक्कापर्यंत एचडीएफसी बँक अधिभार आकारणार आह़े डीलर मार्जिनमध्ये अशी कोणतीही तरतूद नाह़ी त्यामुळे डीलरला हा वाढीव खर्च बोजा ठरणार आह़े त्यामुळे पेडीट, डेबिट कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय झाला आह़े