|Saturday, May 25, 2019
You are here: Home » leadingnews » अखनूरमध्ये दहशतवादी हल्ला, 3 जणांचा मृत्यू

अखनूरमध्ये दहशतवादी हल्ला, 3 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / जम्मू – काशमीर :

जम्मू – काशमीरमधील अखनूरमधील जीआरइएफ(जनरल रिजर्व इंजिनीअर फोर्स)च्या कॉम्पवर दहशतवाद्यांनी आज पहाटे हल्ला केला. या हल्ल्यात तीन कर्मचाऱयांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सीमेलगत असलेल्या अखनूरमध्ये लष्कराच्या तळावर हा हल्ला करण्यात आला असून यामध्ये काही जण जखमी झाले आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, ज्यावेळी पहाऱयावरील असलेल्या जवानांची डय़ुटी बदलत होती त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला. रात्री दोन वाजेच्या दरम्यान हा हल्ला केला. सध्या लष्करांनी संपूर्ण परिसर घेरला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. लष्करी तळावरील हल्ल्यानंतर या संपूर्ण परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील वर्षी स्पटेंबर आणि नोव्हेंबरमध्येही दहशतवाद्यांनी लष्कराच्या अनेक तळांवर हल्ला केला होता.

 

Related posts: