|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » Top News » वनवास संपवण्याच्या ट्विटवरून भडकल्या सुषमा स्वराज

वनवास संपवण्याच्या ट्विटवरून भडकल्या सुषमा स्वराज 

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :

ट्विरवर मदत मागणाऱयांना सतत मदतीसाठी तयार असणाऱया परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना चक्क एका नागरिकाने पत्नीच्या बदलीसाठी ट्विट केल्याने त्या भडकल्या.पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणाऱया स्मित राज या व्यक्तीने सुषमा स्वराज यांना टॅग करत म्हटले की, भारतात तुम्हा आमचा वनवास संपवू शकता का? माझी पत्नी झांशीमध्ये नोकरी करते आणि मी पुण्यात आहे.

या ट्विटनंतर सुषमा स्वराज यांनी प्रत्युत्तर म्हटले की, तुम्ही आणि तुमची पत्नी माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत नोकरीस असता आणि ट्विटरवरून तुम्ही बदलीची मागणी केली असती. तर, तात्काळ मी तुमच्या निलंबनाची नोटीस पाठवली असती. मात्र, राग येऊनही त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या बदलीबाबत ट्विट पाठवले. यावर प्रभू यांनी रेल्वे बोर्डाला याबाबत लक्ष देण्यास सांगितल्याचे म्हटले आहे.

 

Related posts: