|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » भविष्य » धनु

धनु 

निसर्गचक्रातील अत्यंत पवित्र मानलेल्या भाग्यस्थानावर मालकी गाजविणारी ही रास आहे. शुक्र, मंगळ व गुरुचे गुणधर्म या राशीत दिसून येतात. संसारात विरक्ती, संन्याशासारखे वागूनही संसारी रहाणी, अध्यात्मिक क्षेत्र, पिवळा रंग, सर्व तऱहेचे उष्ण पदार्थ, हॉटेल, किचन रुम, ज्वालामुखी, भूगर्भातील प्रचंड उष्णता, पेट्रोलियम या बाबीदेखील याच राशीखाली येतात. आकाशाला गवसणी घालण्याबरोबरच भूगर्भात खोलवर जाणारी ही रास आहे. शिवपिंडीचे एक टक्का टोक जमिनीच्यावर दिसते. परंतु उर्वरीत प्रचंड भाग भूगर्भात असतो. कुत्री, माकडं, मुंगूस, वेतवृक्ष, फणस, राळ, कांबळं, घोंगडी याबाबीही याच राशीखाली येतात. माणसाने मानाने जगावे व सर्व जग आपल्या मुठीत रहावे, अशी यांची धारणा असते. यावषी साडेसातीचा मध्यम टप्पा सुरू आहे व हा काळ चांगला जाईल. अत्यंत धाडसी, प्रचंड कार्यशक्ति, शून्यातून जग निर्माण करणारी, तसेच इतरांना शक्मय नसलेले काम सहजशक्मय करून दाखविणारी रास म्हणजे धनु रास. कितीही संकटे आली तरी त्यातून निश्चित मार्ग काढणारी रास म्हणजे धनु. यावषी राशीस्वामी गुरु दशमात आहे. नोकरी व्यवसाय सरळ चालेल. आर्थिक स्थिती सुधारेल. दागदागिन्यांची खरेदी होईल. सरकारकडून फायदा, मानसन्मान मिळेल. हा गुरु विशेष बलवान नसल्याने त्याची फारशी चांगली फळे मिळतील, असे नाही. वैवाहिक जीवनात काळजी घ्यावी लागेल. कोणतेही व्यसन, प्रेमप्रकरणे अथवा मांसाहार यापासून दूर राहिल्यास गुरुचा त्रास होणार नाही. शनि 9 जानेवारीपर्यंत बारावा आहे. त्यानंतर तो तुमच्या राशीत येईल. शिक्षणात अडथळे येतील. वडिलोपार्जीत इस्टेटीचे काहीतरी घोटाळे होतील. सरकारी कामात त्रास व अडथळे जाणवतील. चोरीमारी यापासून जपा. साडेसातीचा प्रभाव वाढणार आहे. कोणतेही काम रखडणार नाही याची काळजी घ्या. प्रचंड शक्तीची कामे, भूगर्भाचा शोध हीच माणसे घेऊ शकतात. स्क्रॅपमधून गडगंज कमाविणारे व बंद पडलेला उद्योग उर्जितावस्थेत आणणारी माणसे हीच. राशीचक्रातील नवव्या व भाग्यस्थानी आधिपत्य असलेली ही रास म्हणजे धनू, लाथ मारीन तेथे पाणी काढीन ही वृत्ती. मुख व मान हे अत्यंत आकर्षक व भरदार, क्षमतेपेक्षा अधिक कामे स्वीकारून ती पूर्ण करतात. सर्व प्रकारचे कारखाने, स्फोटक वस्तू या सर्वांवर अंमल असणारी ही रास आहे. उत्तर दिशेवर प्रभुत्व असल्याने कुबेराशी विशेष सख्य, त्यामुळे कोणत्याही कामात आर्थिक लाभ किती व कसा याचे गणित प्रथम मांडणार व त्यानुसार  ते काम करायचे की नाही ठरवितात. इतर बाबतीत कितीही भाग्यशाली असली तरी वैवाहिकबाबतीत जरा उदासीन व दुःखी असतात. बाहेरून कुणाला काही बोलू देणार नाहीत. रवी, शुक्र, गुरु, केतू या चार ग्रहांचे वर्चस्व असलेली ही रास आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव अमुकच असेल असे सांगता येत नाही. जिवावरचे प्रसंग असतील अशा क्षेत्रात ही माणसे फार रमतात. या लोकांशी केव्हाही चांगले वागावे तर त्या व्यक्ती वाटेल ते काम करतील, पण कपट कारस्थान यांचा संशय आल्यास नको त्या थरापर्यंत यांची मजल जाते. आकाशाला गवसणी घालणारी व भूगर्भाच्या तळाचा शोध घेण्याची प्रचंड शक्मती असलेली ही रास आहे. एखाद्याला शून्यातून वर आणणारी, कचऱयातून सोने काढणारी ही रास आहे. या राशीत 13 अंशापर्यंत जन्म असल्यास लोक घाबरतात व शांती केल्याशिवाय बाळाचे तोंडही पहात नाहीत. लग्नाच्यावेळेस एखाद्या मुलीच्या कुंडलीतील रास 13 अंशाच्या आत असेल तर तिचे लग्न जुळण्यास फार अडचणी येतात व त्यातही लग्न झालेच तर संसार सुखाचा होईलच याची शाश्वती नसते. संधीवात, हाडांचे सर्व विकार, अति उष्णता, पूर्वाषाढा नक्षत्राची व्यावहारीक बुद्धिमत्ता, उत्तरा नक्षत्राचा मानीपणा, सरकारी नोकरी, उच्च पदप्राप्ती सर्व तऱहेच्या मोठमोठय़ा मशिनरी याच राशीखाली येतात. पूर्णपणे बाराच्या भावात गेलेला व्यवसाय सुरू करून त्याला गत सुवर्ण वैभव प्राप्त करून देण्याचे काम धनु राशीची माणसे उत्तम रितीने करू शकतात. कुणाचेही वाईट करण्याचा विचार हे लोक करणार नाहीत पण वर्तन अथवा कर्म बिघडल्यास भाग्याचे दुर्भाग्यात क्षणार्धात रुपांतर हे लोक करू शकतात.

त्रिकोणस्थानी येणारा हर्षल आगामी 7 वर्षातील मोठी जमेची बाजू म्हणता येईल. शिक्षणात नावलौकिक, परदेशप्रवास, लॉटरी, मटका, शेअरबाजार, सट्टा या मार्गाने धनलाभ होऊ शकतील. हर्षलचे परिणाम दीर्घकालात असतात. संन्याशांच्या जीवनातदेखील प्रेमप्रकरणे निर्माण करणारा आहे. त्यासाठी तरुण, तरुणींनी सावधानता बाळगावी. वर्षाच्या उत्तरार्धात गुरु लाभात येत असून तो एक प्रकारचा कुबेर योग आहे. गेल्या 13 वर्षात जे घडले, ते या गुरुच्या बदलानंतर घडेल. राहू, केतुचे भ्रमण 8 सप्टेंबरनंतर त्रासदायक ठरणार आहे. 10 फेब्रुवारीचे चंद्रग्रहण आरोग्यात बिघाड करेल. वा अपघातदर्शक आहे. 7 ऑगस्टचे चंद्रग्रहण धनस्थानी होत असून आर्थिक बाबतीत खिंडार पडण्याची शक्मयता. ज्यांचा जन्म या राशीत 100 पर्यंत असेल तर बंद पडलेला व्यवसाय चालू केल्यास तो चालू लागेल. तसेच तुटलेले संसार जोडण्याचाही प्रयत्न करा. यावषी काही नैसर्गिक व परमेश्वरी योगांचा रोकडा अनुभव येईल. शनिमुळे महत्त्वाची कामे खोळंबतील. कामाचा वेग वाढवा. उद्योगधंद्यासाठी उत्तम योग. विवाहयोग निश्चित. यावषी संतती योग आहे. मातापित्यांचा उत्कर्ष आरोग्याच्या बाबतीत उत्तम योग. स्वत:ची वास्तू व जागा होऊ शकेल. परदेश प्रवासाच्या संधी येतील. मंगलकार्याचे योग. आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर राहू नका. ज्या ज्यावेळी शनि, मंगळ, हर्षलचा अनिष्ट योग येईल, तेव्हा दुर्घटनेपासून जपा.


 मासवार फलप्राप्ती

जानेवारी – मूळ नक्षत्र असेल तर ही संक्रांत जरा त्रासदायक ठरेल. पूर्वाषाढा, उत्तराषाढा नक्षत्र असेल तर वर्षभर धनलाभ आणि वस्त्रप्रावरणे यांचा लाभ होईल. शुक्र, केतू, नेपच्यून पराक्रमात आहे. हरवलेली अथवा चोरीस गेलेली वस्तू परत मिळेल. कार्यकर्तृत्वाने अनेकांचे मन जिंकाल. प्रेमप्रकरणात गुंतण्याचे योग. शत्रूला देखील मदत कराल. मित्रमंडळी आणि शेजारी यांची वागणूक चांगली राहील. 


फेब्रुवारी – हर्षल-मंगळाचा योग स्फोटक आहे. विजेची उपकरणे, गॅस वगैरे जपून हाताळा. किरकोळ कारणावरून स्फेटक वातावरण निर्माण होईल. नोकरीत उच्च अधिकार प्राप्त होतील. पूर्वाजीत इस्टेट मिळेल. स्वतःचे वाहन, घर व जागा होईल, अतितापट स्वभावाच्या व्यक्तिशी वितंडवाद करु नका. भाग्यस्थ राहुमुळे इतर मार्गाने धनलाभाचे योग. कष्टाचे प्रमाण वाढेल. एखाद्या प्रकरणात बदनामी होण्याची शक्मयता. भावंडांशी वाद-विवाद टाळा. परदेश प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा.


मार्च – रवी-बुधाचे उत्तम सहकार्य आहे. अनेकांची मदत मिळेल. आत्मविश्वासाच्या बळावर मोठ-मोठी कामे यशस्वी कराल. साधनांची कमतरता असूनही कोणतेही काम अडणार नाही. मंगलकार्यासाठी खर्च होईल. आर्थिक बाबतीत मात्र जपावे लागेल.  चोरीमारी, हरविणे यांचा त्यात समावेश राहील. होळीपौर्णिमा भाग्यात होत असल्याने काही न सुटणारे प्रश्न आपोआप सुटतील. उधार उसनवार शक्मयतो टाळण्याचा प्रयत्न करा.


एप्रिल – मंगळ बुध पंचमात असल्याने शैक्षणिक बाबतीत उत्तम यश मिळेल. कमाईचे नवे मार्ग उपलब्ध होतील. श्रीमंत म्हणून गणले जाल. पुत्रसंतान होण्याचे योग. बँक, अकौन्टसी, कॅशिअर, प्राध्यापक तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबध असेल तर हा महिना लाभदायक ठरेल. घराण्यात जर पूर्वी सावकारी व्यवसाय असेल तर त्याचे परिणाम जाणवतील. डोळयांचे आजार व फिटस् यापासून जपा. लॉटरी, सट्टा, जुगार यात मोठी हानी होईल. मामी व काकू यांच्याबाबतीत अप्रिय घटना, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.


मे – धनलाभ व भाग्योदयाच्यादृष्टीने मुलाबाळांचा उत्कर्ष व सांसारीक सुखाच्यादृष्टीने चांगले योग. गूढ समस्यांवर मात कराल. वाहन वगैरे जपून हाताळा. शत्रूच्या कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल. एखाद्याला केलेली मदत यावेळी उपयोगी पडेल. गैरसमज, अपघात, नुकसान अशा घटना घडतील. दीर्घ आजार असतील तर ते कमी होऊ लागतील.


जून – जटिल समस्या मिटतील. धनलाभाच्या दृष्टीने अतिशय प्रबळ ग्रहमान. नको त्या ठिकाणी गुंतवणुकीच्या बाबतीत सांभाळावे लागेल. प्रवास, सासरच्या व्यक्ती, नोकरी व्यवसाय याबाबतीत लाभदायक घटना घडतील. घरगुती बाबतीत महत्त्वाचे फेरबदल. वास्तूतील काही दोष दिसून आल्याने ते दूर करणे सोपे जाईल. उत्तरार्धात काही अप्रिय घटनांची शक्मयता.


जुलै – हमखास धनलाभ होण्याची शक्मयता. आध्यात्मिक क्षेत्रात चांगली प्रगती कराल. शासकीय कामे असतील तर होऊ लागतील पण जरा वेगळे तंत्र वापरावे लागेल. वैवाहिक जीवनात काही अतक्मर्य घटना घडतील. त्यामुळे गैरसमज नष्ट होऊन सुखसमाधान मिळेल. इतर मार्गाने धनलाभाचे योग आणील पण ते धोक्मयाचे ठरेल. जागेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. खर्च फार वाढेल. 


ऑगस्ट –  वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण. पण अतीताणामुळे शारिरिक दोष वर येतील. अपघात, धोका, फसवणूक, आर्थिक हानी या दृष्टीने त्रासदायक काळ. रवीचे भ्रमण सर्व बाबतीत लाभदायी. दीर्घकाळ लग्न होत नसेल, वय वाढलेले असेल तर अचानक लग्न ठरेल. प्रेमप्रकरणे निर्माण होतील. या महिन्यात पाणथळ ठिकाणी जाण्याचे टाळा. 


सप्टेंबर – हा महिना म्हणावा तसा यशस्वी नाही. निराशाजनक आहे. नोकरी व्यवसायात महत्त्वाची स्थित्यंतरे घडतील. 4 ते 7 तारखेस अनेक महत्त्वाच्या कार्याची सुरुवात होईल. संतती, धनलाभ व भाग्योदयाच्यादृष्टीने चांगले योग. सांसारिक सुखाच्यादृष्टीने अनुकूल वातावरण. गूढ समस्यांवर मात कराल.


ऑक्टोबर  – एखादी नवी व्यक्ती आयुष्यात येईल. शत्रूच्या कारवाया वाढतील पण त्या फायदेशीर ठरतील. जीवनाला चांगले वळण मिळेल. मानसिक समाधान देणारे योग. वाहन, वास्तु, जागा, दुकान वगैरे खरेदी करू शकाल. गुरुचे लाभातील आगमन सर्व तऱहेने सुखसमृद्धीचा वर्षाव करील. आर्थिक बँक बॅलन्स वाढेल. प्रतिष्ठा वाढविणारा योग. सामाजिक व राजकीय क्षेत्रात असाल तर उच्च पद तसेच निवडणुकीत यशस्वी व्हाल.


नोव्हेंबर- रवि, गुरु, शुक्र लाभात हा भाग्योदयकारक योग आहे. संतती योग उत्तम. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. श्रीमंत लोकांचे सहकार्य मिळेल. जमीन जुमला, वाहन यांचा लाभ होईल. हौसमौज करू शकाल. कुटुंबात काही मंगलदायक घटना घडतील. नोकरचाकर ठेवण्याची ऐपत निर्माण होईल. समाजात मानसन्मान मिळेल. मोठमोठय़ा उलाढाली करून गडगंज पैसा कमवाल. सर्व तऱहेच्या व्यसनापासून दूर रहावे लागेल. तसेच कोणत्याही अनैतिक कृत्यात गुंतू नका. एखाद्या वेळेस जुने वाहन वा घर घेण्याचे योग आल्यास ती संधी सोडू नका. तसेच जर तुमच्या हातून एखाद्याचे कल्याण करण्याचा योग आल्यास निश्चित करा. दीर्घलाभ होईल.


डिसेंबर- या महिन्यात रवि, शनिचा योग थोडा त्रासदायक आहे. आजारपण अचानक काही समस्या उद्भवणे. आर्थिक गंडांतर, फसवणूक, जुगार व व्यसनामुळे जबर हानी. सरकारी नोकरांमुळे जबरदस्त त्रास होईल. काही प्रकरणे अंगलटही येऊ शकतील. परंतु गुरु, शुक्र, शनिच्या पाठिंब्यामुळे सर्व संकटातून सहीसलामत बाहेर पडाल. या महिन्यात कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नका. कुटुंबातील काही बाबी गंभीर स्वरुप धारण करतील. त्यातून काही गंभीर प्रसंग निर्माण होतील. वाहन जपून चालवा. विद्युत तारेखाली उभारून बोलू नका. क्षुल्लक चूकदेखील गंभीर प्रसंग निर्माण करू शकेल.

Related posts: