|Saturday, February 23, 2019
You are here: Home » क्रिडा » स्पेनच्या लोपेझची विजयी सलामी

स्पेनच्या लोपेझची विजयी सलामी 

वृत्तसंस्था / ऑकलंड

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील ऑकलंड क्लासिक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत सोमवारी स्पेनच्या फेलिसियानो लोपेझने न्यूझीलंडच्या व्हिनसचा पराभव करत विजयी सलामी दिली. हॉलंडचा रॉबिन हॅस तसेच झेकचा व्हॅसेली यांनी विजय नोंदविले.

लोपेझने व्हिनसवर 3-6, 6-4, 6-3, अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनने फ्रान्सच्या स्टिफेनी रॉबर्टवर 6-4, 6-3, हॉलंडच्या रॉबिन हॅसने न्यूझीलंडच्या टिरेनीवर 6-4, 7-5, झेकच्या व्हॅसेलीने अर्जेंटिनाच्या झेबालोसवर 6-4, 6-3, टय़ुनेसियाच्या जेझारिने अर्जेंटिनाच्या शुवार्झमनवर 7-6 (7-1), 6-3 तसेच जर्मनीच्या डस्टिन ब्ा्राऊनने अमेरिकेच्या मिमोहवर 7-6 (7-4), 3-6, 6-4 अशी मात करत पुढील फेरी गाठली.

 

 

Related posts: