|Monday, July 31, 2017
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावर 75 लाखांचे सोने जप्तदाबोळी विमानतळावर 75 लाखांचे सोने जप्त 

महसूल संचालनालयाच्या गुप्त पथकाची कारवाई

प्रतिनिधी/ वास्को

दाबोळी विमानतळावर काल सोमवारी पहाटे तीन किलो सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी एका हवाई प्रवाशाला अटक करण्यात आलेली असून तो तामिळनाडुचा रहिवासी असून अब्दुल अन्सारी असे नाव आहे.

  महसूल संचालनायाच्या गुप्त पथकाने ही तस्करी पकडली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे 75 लाख रूपये एवढी आहे. काल सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास अब्दुल अन्सारी दुबईहून एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक एआय 994 या विमानातून दाबोळी विमानतळावर उतरला होता. त्याच्याकडे तीन किलोग्रॅम सोने होते. विमानतळावर उतरल्यानंतर झालेल्या तपासणीत त्याच्याकडे हे सोने आढळून आले. हे सोने त्याने आपल्या बॅगेतच लपवले होते. विटांच्या स्वरूपात हे सोने होते. त्यामुळे महसूल संचालनालयाच्या गुप्त विभागाच्या अधिकाऱयांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील सोने जप्त केले व तस्करीच्या गुन्हय़ांखाली त्याला अटक केली आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!