|Thursday, December 13, 2018
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य संक्रांती व करिदिनाचे महत्त्व

राशिभविष्य संक्रांती व करिदिनाचे महत्त्व 

बुध. दि. 11 ते  17 जानेवारी 2017

येत्या 12 रोजी पौर्णिमा व 14 रोजी मकर संक्रांती व रविवारी करीदिन आहे. संक्रांतीविषयी धार्मिक स्पष्टीकरण पंचागांत पहावे. आरोग्य प्राप्ती, धनप्राप्ती, नोकरीतील गंडातरे, वास्तुदोष निवारणासह अनेक महत्त्वाची कार्यसिद्धी कुलदेवता व लक्ष्मीचा कृपा प्रसाद  व कुटुंबाचा उत्कर्ष होण्यासाठी संक्रांतीचे पूजन अतिशय महत्त्वाचे मानलेले आहे. त्या दिवशी सकाळी 7.38 ते दुपारी3.38 पर्यंत संक्रांतीचा पुण्यकाल आहे. या काळात तिळमिश्रित पाण्याने स्नान, तिळाचे उटणे शरीरास लावणे तिळ व तुपाचा होम, तिळ, तर्पण, तीळ, भक्षण व तीळदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता घराण्यातील अनेक दोष नष्ट होतात. अनेक जन्मातील महापापे नष्ट होतात. संक्रांत ज्या दिशेकडून येते तेथे चांगले होते. ज्या दिशेकडे जाते किंवा पहाते त्या तिकडे हानी होते. संक्रांतीचा प्रभाव प्रामुख्याने राष्ट्रावर व दाही दिशावर पडतो. संक्रांत जी वस्तू धारण करते ती महाग अथवा दुर्मीळ होते तिचे जे वाहन असते अथवा ज्याच्यावर तिची नजर पडते तेथे काही ना काही संकटे व अडचणी येतात. त्याचे परिणाम वर्षभर राहतात. संपूर्ण वर्ष चांगले जावे. भरभराट व्हावी. घराण्यावर कोणतीही संकटे येवू नयेत कुणाची वाईट नजर पडू नये, आसुरी शक्तीचा नाश व्हावा यासाठी सर्व पुजेत श्रे÷ अशी ही संक्रांती पूजा असते या दिवशी कुणालाही चुकूनही वाईट बोलू नये, अथवा भांडण तंटे करू नयेत मुके प्राणी व झाडांची कत्तल करू नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम बुमऱयांगसारखे उलटतात  व वर्षभर ते भोगावे लागतात या दिवशी गूळ, तीळ दान तसेच मधूर बोलणे हे हे पापनाशक व सर्वदोष नष्ट करणारे समृद्धी देणारे तसेच सर्वांगीण प्रगती करणारे असल्याने या दिवशी तीळ गूळ देवून गोड बोला असे म्हणून शुभेच्छा देण्याची हिंदूंची प्रथा आहे. यादिवशी सर्वांनी आपल्या घरी आपल्याला आवडणारी कोणतीही पूजा करावी संक्रांतीचा पुण्यकाल हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे या काळात केलेले धार्मिक कार्य वर्षभर शुभ फळे प्रदान करते. संक्रांत ही अशुभ नसते पण त्यादिवशी कुणाचा अपमान अथवा भांडणतंटे किंवा देवाला उलट सुलट बोलल्यास, व्यसन अथवा मासाहार किंवा मुक्मया प्राण्यांची हत्या केल्यास वर्षभर दारिद्रय़ येते नोकरी सुटते किंवा उद्योगव्यवसाय डबघाईला येतो व अनेक दुर्धर रोग होतात. त्यासाठीच संक्रांतीला सर्वांनी गोड बोलावे व गोड वागावे, अशी प्रथा आहे. संक्रांतीला पूर्वापार चालत आलेले शत्रुत्व मिटवावे असूरावर अन्याय होवू नये यासाठी संक्रांतीचा दुसरा दिवस या अशुभ शक्तीसाटी राखून ठेवलेला आहे जे जे अनिष्ट कर्म केलेले असते त्यांना कठोर शिक्षा देण्याचे काम असूरावर सोपविलेले असते. सत्ताधाऱयावर या दिवसाचा अधिक प्रभाव असतो. त्यामुळे संक्रांती आली की सत्ताधारी लोक घाबरतात हा वाईट शक्तीचा दिवस असतो. त्यामुळे यादिवशी दैवी शक्ती क्षीण व आसुरी शक्ती प्रभावी असते. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ काम करीत नाहीत. जास्तीत जास्त अनिष्ट घटना या संक्रांती करिदिनादिवशीच घडतात. यावेळी करीदिन अतिशय कडक आहे. यादिवशी अपघात व दुर्घटना घडल्यास वाचण्याची शक्मयता कमी असेत वाहन जपून चालवावे चाकू सुऱया व विळय़ा यांत्रिक उपकरणे जपून हाताळावीत, गंभीर आजारी रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये.  महामंडळाचे मोठमोठे पदाधिकारी आमदार, खासदार मंत्री व पंतप्रधान त्यांच्या बऱया वाईट कर्मानुसार फळ या दिवसापासून मिळण्यास सुरू होते. यावेळचे ग्रहांचा जो साप्ताहिक अंदाज पुढे दिलेला आहे. तो संक्रांतीवर असून त्याचे परिणाम वर्षभर  राहतील.


मेष

पौर्णिमा शुभयोगात आहे. संक्रांत नोकरी व्यवसायात चांगली यश मिळवून देईल. भरणी, कृत्तिका नक्षत्र व्यक्तींना सर्व तऱहेचे लाभ वर्षभर होत राहतील. वाहन व इतर बाबतीत जपून रहावे. कुलदेवतेचे स्मरण करावे. व्यसन असेल तर ते सोडावे म्हणजे संक्रांतीची अतिशय चांगले फळे मिळतील. आगामी महिनाभर वाहन अतिशय जपून चालवा.


वृषभ

शाकंभरी पौर्णिमा धनयोगात आहे. संक्रांतीच्या पुण्यकालात दैवी उपासना करा. त्याचा चांगला अनुभव येईल. करिदिनी आरोग्याची काळजी घ्या. विषारी पदार्थ व कॉसमेटिक्स तसेच रसायने व मुदतबाहय़ औषधे धोकादायक ठरू शकतील. या दिवशी प्रवास शक्मयतो टाळण्याचा प्रयत्न करा.


मिथुन

शाकंभरी  पौर्णिमा तुमच्या राशीत होत आहे. आर्थिक बाबतीत चांगली आहे. कटुता टाळण्याचा प्रयत्न करा. संक्रांतीच्या पुण्यकाळात केलेले धार्मिक कार्य तुम्हाला अनेक कामात मोठे यश मिळवून देईल. करिदिन बाधिक पीडा निर्माण करील. या दिवशी कोणत्याही बाधिक ठिकाणी जावू नका. अथवा बाधिक व्यक्तीपासून दूर रहा. शत्रूपीडेपासून जपावे लागेल.


कर्क

कार्यसिद्धीयोगावरील पौर्णिमा आरोग्याच्याबाबतीत चांगली नाही. सर्व प्रकारे सावधानतेने वागावे. संक्रांतीच्या पुण्यकाळात केलेले धार्मिक कार्य नोकरी व वैवाहिक जीवनातील अनेक अडचणी दूर करील. करिदिन मित्रमंडळी अथवा मान्यवर व्यक्तींच्याकडून अपमानास्पद प्रसंग आणण्याची शक्मयता आहे. काही आरोप येतील. त्यासाठी सावध राहणे चांगले.


सिंह

शाकंभर पौर्णिमा लाभात होत आहे. सर्व बाबतीत चांगली आहे. पण अल्पवयीन मुलांना महिनाभर वाहन देणे धोकादायक ठरेल. संक्रांतीच्या पुण्य कालातील  कुलदेवता पूजन तुम्हाला सर्व कामात मोठे यश, तसेच  शत्रुवर विजय मिळवून देईल. करिदिन नोकरी व्यवसायाच्या बाबतीत त्रासदायक फळ निर्माण करण्याची शक्मयता.


कन्या

सिद्धयोगावरील पौर्णिमा दशमस्थानी होत आहे. व्यवसायात शुभ घटना पण बाधिकपीडा व वास्तुदोषाचा त्रास होईल. त्यासाठी वास्तुशास्त्राच्या अथवा फेंगशुईच्या मागे न लागत. संक्रांतीच्या पुण्य कालात आपल्याला आवडणाऱया कोणत्याही देवतेचे पूजन करा. त्याचा चांगला परिणाम दिसेल. करिदिन प्रवासात घोटाळे व नुकसान घडवील.


तुळ

कार्यसिद्धीयोगावरील पौर्णिमा अत्यंत शुभ फळदेणारी आहे. सर्व कामात यश. घर बांधण्याचे स्वप्न साकार होईल. विवाहाच्या वाटाघाटीत यश. संक्रांतीच्या पुण्यकालात कोणत्याही देवतेचे पूजन करा. त्याचा चांगला परिणाम दिसेल. करिदिन वादविवादात नुकसान घडवील. महत्त्वाच्या वस्तुची मोडतोड होईल.


वृश्चिक

आठव्या स्थानी होत असलेली शांकंभरी पौर्णिमा आर्थिक बाबतीत शुभ आहे. पण व्यवहारात सावधानता बाळगण्यास सुचवित आहे. नातेवाईकांचा त्रास शत्रुत्व व्यवसायाला नजर लागलेली असेल तर संक्रांतीच्या पुण्यकालात कोणतेही धार्मिक कार्य करा. त्याचा उपयोग होईल. करीदिन शेजारी संबंधावर प्रभाव पाडील.


धनु

कार्यसिद्धीयोगावरील पौर्णिमा तुमच्या राशीत होत आहे. व्यक्तिमत्त्वावर प्रभाव राहील. सांसर्गिक व्यक्तीमुळे नको ते आजार उदभवतील. शत्रुत्व आर्थिक नुकसान कटकटी यापासून त्रस्त असाल तर संक्रांतीच्या पुण्यकालात कुलदेवतेसाठी धार्मिक कार्य घरात करा. पण पूजा मात्र व्यवस्थित झाली तरच त्याचे अनुभव येतील. करिदिन आर्थिक बाबतीत अशुभ आहे.


मकर

 एखादे शुभ काम होणार असते पण दैव देते पण कर्म नेते असा अनुभव येईल. ज्या व्यक्तीमुळे आपले भले हाणार असते त्याच्याविषयी गैरसमज करून घेतल्यामुळे फार मोठी संधी हातची जाण्याची शक्मयता. गुप्त शत्रुत्व शारीरिक पीडा, मानहानी, आर्थिक अडचणी निर्माण होतील. संक्रांतीच्या पुण्यकालात कुलदेवतेची पूजा अर्चा शास्त्राsक्तरित्या करा. तुमचे बरेच प्रश्न सुटतील.


कुंभ

मुलाबाळांच्या बाबतीत शुभ फळ देणारी आहे. अत्यंत कठीण कामे सहजरित्या होतील. जागा, दुकान वाहन वा इतर कामासाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. संक्रांतीच्या पुण्यकाळात घरात कुलदेवतेचे शास्त्राsक्त पूजन करावे. धार्मिक कार्य व्यवस्थित झाल्यास बरेच निर्णायक प्रश्न सुटतील. करिदिनी वास्तुत बाधा होण्याचे योगा.


मीन

पौर्णिमा महत्त्वाच्या केंद्रस्थानी होत आहे. राहत्या जागेत व नोकरी व्यवसायात महत्त्वाचे फेरबदल घडण्याचे योग. संतती, नोकरी व्यवसायात काही अडचणी असतील तर संक्रांतीच्या पुण्यदिनी घरात काही तरी देवधर्म करा. चांगला अनुभव  येतील. करिदिन माता-पिता, सासू-सासरे, प्रवास व नातेवाईक यांच्या बाबतीत अनिष्ट आहे.

Related posts: